५०१. सिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा [पं. अगीकार. ] ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अहो दीनानाथा आनंदमुरती [पं. दे. क. मूर्ति. ] । तुह्मांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ ६५ ॥ बहुतांनीं विनविलें [पं. निरविलें.] बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥ २ ॥ तुका ह्मणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥३॥
५०२. उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी [पं. संवारुनी. ] ॥ ६५ ॥ केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥ २ ॥ लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥ ३ ॥
५०३. पावला प्रसाद आतां [दे. विटोनि.] उठोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे [पं. भावें. ] जीवें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ [त. आतां सुखें स्वामी.] आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा || ६६ ॥ तुह्मांसि जागवूं आह्मी आपुलिया चाडा । शुभाशुभ [त. कर्म. ] कर्में दोष [पं. हाराया. ] वाराया पीडा ॥ २ ॥ तुका ह्मणे दिलें उच्छिष्टाचें भोजन । [पं. नाहीं निवडिलें आह्मां आपुल्या भिन्न.] आह्मां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥ १३ ॥
५०४. शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ ४५ ॥ संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समर्पिलें ॥ २ ॥ रंगलीं [पं. रंगली इंद्रिय.] इंद्रियें सुरंग तांबूल माथां तुळसीदळ समर्पिलें ॥ ३ ॥ एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥ ४ ॥ न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥ ५ ॥ T
५०५. उठोनियां तुका गेला निजस्छळा । उरले राउळा माजी देव ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ निउल [पं. नेउले.] जालें सेवका स्वामीचें । आज्ञे करुनी चित्त समाधान ॥ ६५ ॥ पहुडलिया हरी अनंतशैनावरी [पं. अनंतसेनावरी.] । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥ २ ॥ अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥ ३ ॥
दसरा - अभंग १.
५०६. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा [दे. त. जेजेकार.] जयजयकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ या हो या हो बाइयानो निघाले हरी । सिलंगणा वेगीं [पं. घेउनि वेगीं.] घेउनि आरत्या करीं । ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आह्मां दैव आलें येथें घरिच्या घरीं ॥ ५ ॥ अक्षय मुहूर्त औटामध्यें [दे. क. औठामध्यें] साधे तें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत [क. होतें.] जातें । ह्मणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी सांगातें ॥ २ ॥ बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका [पं. गई.] गै करूं आइकाल ज्या कानीं । मग हें सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होईल काहाणी ॥ ३ ॥ ऐसियास वंचती त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार । मग हे वेळ घटिका न ये अजरामर । कळलें असों द्या मग पडतील विचार || ४ ॥ जयासाठीं ब्रह्मादिक जालेति पिसे । उच्छिष्टा कारणें देव जळीं जाले मासे । अर्द्धांगीं विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु ह्मणे आलें अनायासें ॥ ५ ॥
५०७. ओवाळूं आरती [पं. आरती माझ्या. ] पंढरीराया । सर्वभावें शरण आलों तुझिया पायां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सर्व व्यापून कैसें [त. रूप कैसें] रूप आकळ । तो हा गौळ्या घरीं जाला कृष्ण बाळ ॥ ६ ॥ [पं. स्वरूप गुणातीत अवतार धरी ।] स्वरूप गुणातीत जाला अवतारधारी । तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥ २ ॥ भक्तीचिया काजा कैसा रूपासि आला । ब्रिदाचा तोडर [त. तोरडु. पं. तोडरु. ] चरणीं मिरविला ॥ ३ ॥ आरतें आरती [पं. आरती कैसी.] ओवाळिली । वाखाणितां कीर्ति वाचा परतली ॥ ४ ॥ भावभक्तिबळें होसी कृपाळु देवा । [पं. तुका ह्मणे तुझ्या.] तुका ह्मणे पांडुरंगा तुझ्या न कळती मावा ॥ ५ ॥
५०८. करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आजि पुरले नवस | धन्य जाला हा दिवस ॥ ६६ ॥ पाहा वो सकळा। पुण्यवंता तुह्मी बाळा ॥ २ ॥ तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥ ३ ॥
५०९. द्याल माळ [पं. तरी.] जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आलें तें हिशोबें [पं. क. ही शोभे.] अवधिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ ४९ ॥ मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥ २ ॥ तुका ह्मणे तुह्मी जालिया कृपण । नामाची जतन मग कैची ॥ ३ ॥
५१०. तुझीं जावें निजमंदिरा । आह्मी जातों आपुल्या घरा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ विठोबा लोभ असों देई । आह्मी असों तुमचें पाईं ॥ ४५ ॥ चित्त करी सेवा | आह्मी जातों आपुल्या गांवा ॥ २ ॥ तुका ह्मणे दिशा भुलों | फिरोन पायापाशीं आलों ॥ ३ ॥
५११. पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ शेष घेऊनि जाईन | तुमचें जालिया भोजन ॥ ४६ ॥ जालों एकसवा । तुह्मां आडुनियां देवा ॥ २ ॥ तुका ह्मणे चित्त | करूनि राहिलों निश्चित ॥३ ॥
५१२. केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आह्मां पोटाची चिंता ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवूं द्या वारा उब जाली शरीरा ॥ ६ ॥ उशिरा उशीर किती काय ह्मणावा । [पं. जननी या.] जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥ २ ॥ तुझिये संगतीं [दे. क. येऊ. ] आह्मीं करूं कोल्हाळ । तुका ह्मणे बाळें अवघीं [पं. अवधे.] मिळोन गोपाळ ॥ ३ ॥
५१३. कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां [त. मोडोनियां.] ॥ ६ ॥ आलें शेवटीचें दान । भागा आला नारायण ॥ २ ॥ तुका ह्मणे पोट भरलें वारले [पं. क. वारला. ] बोभाट ॥ ३ ॥
५१४. आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुची आई ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ देई गे विठाबाई [पं. विठाई.] प्रेमभातुकें । अवधियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ ६६ ॥ असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहे कृपादृष्टी आतां पंढरीराया ॥ २ ॥ तुका ह्मणे आह्मी तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥ ३ ॥
५१५. आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ ६५ ॥ देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥ २ ॥ राग येतो [पं. येईल.] देवा । तुका ह्मणे नेघे सेवा ॥ ३ ॥
५१६. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारु भवनदीची [पं. भवनदी. ] ॥ ६६ ॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्ञ्जन कृष्ण माझा ॥ २ ॥ तुका ह्मणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥ ३ ॥
५१७. कृपा करावी भगवंतें । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ ६६ ॥ व्हावा ब्रह्मज्ञानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥ २ ॥ तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥ ३ ॥
५१८. जातो वाराणसी । निरवी गाई घोडे हौसी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य [त. माना हा.] मानावा भरवसा ॥ ६६ ॥ नका काढूं माझीं पेवें । तुह्मीं वरळा भूस खावें ॥ २ ॥ मिकारियाचे पाठीं । तुह्मी घेउन लागा काठी ॥ ३ ॥ [ दे. त. सांगा. ] सांगाल जेवाया ब्राह्मण । तरी [ दे. त. कापा.] कापाल माझी मान ॥ ४ ॥ वोकलिया वोका । म्यां खर्चिला नाहीं रुका ॥ ५ ॥ तुह्मीं खावें ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥ ६ ॥ नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥ ७ ॥ तुका ह्मणे नीट [प नष्ट] होतें तैसें बोले [त. केलें. ] स्पष्ट ॥ ८ ॥
५१९. कास घालोनी बळकट । झालों कळिकाळासी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी [त. कामी गुंतलें रिकामें । जपी तपी येथें जमे । लाविलें दमानें। पं. कामीं.] कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे । मुक्त आणि मुमुक्षा ॥ २ ॥ एकंदर शिका | पाठविला इहलोका । आलों ह्मणे तुका । मी नामाचा धारक ॥ ३ ॥
५२०. आह्मी वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावें [दे. क. वर्ताव्या प. वर्ताया.] वर्तावया ॥ १ ॥ ॥ध्रु. ॥ सांडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ ४५ ॥ अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी [त. लोभीं.] मन । साधनें [पं. साधन बुडविलें.] बुडविलीं ॥ २ ॥ पिटूं भक्तीचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका ह्मणे करा । जयजयकार [दे. त. जेजेकार.] आनंदें ॥ ३ ॥
५२१. बळियाचे अंकित । आह्मी जालों बळिवंत ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ लपता हाणोनि [त. हला. पं. हणिला.] संसारा [पं. त. संसार.] । केला षडूर्मीचा [पं. षडूर्मीमार. ] मारा ॥ ६ ॥ जन धन तन । केलें तृणाही समान ॥ २ ॥ तुका ह्मणे आतां । आह्मी मुक्तीचिया माथां ॥ ३ ॥
५२२. मृत्युलोकीं आह्मां आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ विटलें हें प्रपंचापासूनि । वमन [त. बैसलेंसे मनीं रामनाम.] हें मनीं बैसलेंसे ॥ ४५ ॥ सोनें रूपें आह्मां मृत्तिके समान । माणिकें पाषाण खडे तैसे [पं. जैसे.] ॥ २ ॥ तुका ह्मणे तैशा दिसतील नारी। रिसाचियापरी आह्मांपुढें ॥ ३ ॥
५२३. स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ [पं. अंतरे. ] | नाठवे हा देव घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ ४६ ॥ दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें। लावण्य तें खरें दुःखमूळ ॥ २ ॥ तुका ह्मणे जरी अग्नि जाला साधु । [पं. तरी.] परी पावे बाधूं संघट्टणें ॥ ३ ॥
५२४. पराविया नारी रखुमाईसमान [पं. माउली ] । हें गेलें [त. पं. रखुमाई जन पांडुरंगे.] नेमून ठायींचें चि ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ जाईं वो तूं माते न करीं सायास । आह्मी विष्णुदास [पं. तैसे नव्हों.] नव्हों तैसे ॥ ६५ ॥ न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥ २ ॥ तुका ह्मणे तुज पाहिजे भ्रतार । तरी [पं. तरी का इतर लोक थोडे.] काय नर थोडे जाले ॥ ३ ॥
५२५. भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सले । विठ्ठले [त. पं. विठ्ठल. ] कृपाळे होसी माये ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥ २ ॥ तुका ह्मणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देईं ॥ ३ ॥
५२६. तुजविण मज कोण वो [त. हो.] सोयरें। आणीक दुसरें पांडुरंगे ॥ १ ॥ लागलीसे आस पाहा तुझें वास। रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥ २ ॥ काम गोड मज न लगे हा धंदा । तुका ह्मणे सदा हें चि ध्यान ॥ ३ ॥
५२७. [पं. त. पढीयंतें.] पढियंतें आह्मी तुजपाशीं [त. जयायें . ] मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे [त. होसी माये. ] जननिये ॥ ४५ ॥ जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आह्मां ॥ २ ॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा। नाहीं जात घरा आणिकांच्या ॥ ३ ॥ सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे देसी मागेन तें ॥ ४ ॥ ह्मणउनि पुढें मांडियेली आळी | थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥ ५ ॥
५२८. कोण पर्वकाळ पहासील तीथ [त. थीत.] । होतें माझें चित्त कासावीस ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ पाठवीं भातुकें प्रेरीं [पं. प्रेमे.] झडकरी । [पं. नका. ] नको राखों उरी पांडुरंगा ॥ ४५ ॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी ह्मणोनियां ॥ २ ॥ काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥ ३ ॥ काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥ ४ ॥ तुका ह्मणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥ ५ ॥
५२९. कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें [त. तुह्मीं.] ॥ ६५ ॥ येणें [पं. क. काळ बुंथी.] काळें बुंथी घेतलीसे खोल [पं. खोळ. ] । कां नये विटाळ होऊं माझा ॥ २ ॥ लाज वाटे मज ह्मणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका ह्मणे ॥३॥
५३०. उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ ६६ ॥ आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन काय वेंचे ॥ २ ॥ तुका ह्मणे तुह्मां साजे हें श्रीहरी । आह्मी निलाजिरीं [दे. पं. नाहीं.] नव्हों ऐसीं ॥ ३ ॥
५३१. आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरी तूं भीतोसि पांडुरंगा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ ४५ ॥ ऋद्धिसिद्धि तुझें मुख्य [पं. मोक्ष. ] भांडवल । हें तों आह्मां फोल भक्तीपुढें ॥२॥ तुका ह्मणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निश्चित [क. निश्चित. पं. निवांत.] सुख भोगूं ॥ ३ ॥
५३२. न लगे हें मज तुझें ब्रह्मज्ञान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या [पं. हे. ] ॥ ६६ ॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं ही [क. हे. पं. तें.] ॥ २ ॥ तुका ह्मणे नको रागेजों विठ्ठला । उठीं देईं मला भेटी आतां ॥ ३ ॥
५३३. कमोदिनी [पं. कुमुदिनी.] काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आह्मी च तें प्रेमसुख जाणों ॥ ६५ ॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥ २ ॥ तुका ह्मणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥ ३ ॥
५३४. काय सांगो तुझ्या चरणांच्या [पं. चरणींच्या.] सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बोलतां हें कैसें वाटे खरेपण | अमृताचे गुण अमृतासी ॥ ६६ ॥ आह्मी एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥ २ ॥ तुका ह्मणे आह्मां मोक्षाचा कांटाळा । कां तुह्मी गोपाळा नेणां ऐसें ॥ ३ ॥
५३५. देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ ५ ॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥ २ ॥ तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । [त. तुष्य. दे. तुश.] तुच्छ हें बापुडें सकळी [त. पं. सकळ ही.] काळ ॥ ३ ॥
५३६. आतां येणेंविण नाहीं आह्मां चाड । कोण बडबड करी वांयां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सुख पुण्यपाप खरें । हें तों आह्मां बरें कळों आलें ॥ ६६ ॥ तुका ह्मणे वाचा [दे. क. वाईली. ] वाहिली अनंता । बोलायचें आतां काम नाहीं ॥ २ ॥ तें चि दुःख
५३७. बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें [त. पं. जनी जनीं ?). ] जनि आह्मां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ भोगीं त्याग जाला संगीं च असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥ २ ॥ तुका ह्मणे नव्हें दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा [पं. विठोबासी.] ॥ ३ ॥
५३८. अधिकार तैसा [त. पं. दावियेला.] दावियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ जाळं ये नाव पावलेनि पार | मागील आधार बहुतांचा ॥ २ ॥ तुका ह्मणे रोग वैद्याचे [दे. त. वैदाचे.] अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥ ३ ॥
५३९. संवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥ १ ॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥ २ ॥ तुका ह्मणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥ ३ ॥
५४०. देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥ १ ॥ तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥ २ ॥ तुका ह्मणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥ ३ ॥
५४१. काळें खादला हा अवघा आकार । उत्पत्तिसंहारघडामोडी ॥ १ ॥ वीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकचिया ॥ २ ॥ तुका ह्मणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें [पं. कैसें.] कळों नये ॥ ३
५४२. आणीक काळें न चले उपाय । धरावे [पं. ते.] या पाय विठोबाचे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवधिया तुटी होय पापा ॥ ५ ॥ अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥ २ ॥ काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥ ३ ॥ तुका ह्मणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥ ४ ॥
५४३. कां रे [पं. हा शब्द नाहीं.] माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अगा नारायणा निष्ठुरा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ ६ ॥ कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंद्रियांची गति कुंटे [क. खुंटे.] चि ना ॥ २ ॥ तुका ह्मणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥ ३ ॥
५४४. दीनानाथा तुझीं ब्रिदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आह्मां रोकडे कळों आले ॥ ५ ॥ आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥ २ ॥ चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें [पं. तें. चि. ] पुरें करूं धावें ॥ ३ ॥ तुका ह्मणे तुज भक्तीचें कारण । करावया पूर्ण अवतार ॥ ४ ॥
५४५. वर्णू महिमा ऐसी नाहीं [पं. मज नाहीं वाचा.] मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ठायची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ ६६ ॥ नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥ २ ॥ मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥ ३ ॥ तुका ह्मणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥ ४ ॥
५४६. [पं. नव्हे.] नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य [पं. विषातुल्य.] चांग मिष्टान्न तें ॥ ६६ ॥ नाइकवे स्तुति वाणितां [पं. क. वानितां . ] थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥ २ ॥ तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥ ३ ॥ तुका ह्मणे आतां करीं माझें हित काढावें जळत आगींतूनि ॥ ४ ॥
५४७. न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हें चि सांगे ॥ ४५ ॥ विटंबो शरीर होत कां विपत्ति । परि राहो चित्तीं नारायण ॥ २ ॥ तुका ह्मणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तें चि हित ॥ ३ ॥
५४८. पिंड पोसावे हें अधमाचें ज्ञान । विलास मिष्टान्न करूनियां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ ४५ ॥ क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥ २ ॥ कर्वतिलीं [पं. कर्वतिले देह. ] देहें कापियेलें मांस । गेले वनवासा [त. वनवासास.] शुकादिक ॥ ३ ॥ तुका ह्मणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥ ४ ॥
५४९. जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सकळां इंद्रियां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ ६६ ॥ आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं न पाहावें ॥ २ ॥ चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित होउनी निश्चित एकविध ॥ ३ ॥ चला पाय [पं. हात पाय.] हात हें चि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबाच्या ॥ ४ ॥ तुका ह्मणे तुह्मां भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥ ५॥
५५०. करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न ह्मणें संत ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ ५ ॥ जगदेव परी निवडीन निराळे । ज्ञानाचे आंधळे भारवाही ॥ २ ॥ तुका ह्मणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥ ३॥
५५१. ह्मणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाईंडाईं ॥ ६ ॥ पर्जन्याचे काळीं वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ॥ २ ॥ हिऱ्या ऐशा गारा दिसती दूरोन । तुका ह्मणे घन [क. पं. त. घण.] न भेटे तों ॥ ३ ॥
५५२. अतिवाद [क. अतिवादें. ] लावी । एक बोट सोंग दावी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ ६६ ॥ प्रतिपादी वाली। एक पुजी एका छली ॥ २ ॥ तुका ह्मणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥ ३॥
५५३. पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अर्थी परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी [त. भीकें. ] भीके सोंग वांयां ॥ ६ ॥ देवाचीं चरित्रे दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥ २ ॥ तुका ह्मणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखा चि ॥ ३ ॥
५५४. भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ भाविकांनीं दुर्जनाचें । [पं. कांहीं मानूं नये साचें.] मानूं नये कांहीं साचें ॥ ४६ ॥ होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥ २ ॥ तुका ह्मणे [क. त. पं. त्याचे. ] त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥ ३ ॥
५५५. जप करितां राग आला जवळी तो मांग ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ ४५ ॥ कुड्याची संगती सदा भोजन पंगती ॥ २ ॥ तुका ह्मणे ब्रह्म | साधी विरहित कर्म ॥ ३ ॥
५५६. कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा एकट ठायींचा ठायीं एक ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां । [पं. अवघेचि वांयां विण बोल.] अवघें चि वांयांविण बोलें ॥ ४६ ॥ नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥ २ ॥ नाहीं आह्मां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥ ३ ॥ तुका ह्मणे नांवरूप [त. नाम] नाहीं आह्मां । वेगळा ह्या कर्मा अकर्मासी ॥ ४ ॥
लोहगांवास परचक्रवेढा पडला - अभंग ३.
५५७. न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ काय तुह्मी येथें नसालसें जालें । आह्मीं न देखिलें पाहिजे हें ॥ ४५ ॥ परचक्र कोठें हरिदासांच्या वासें न [ दे. त. हा शब्द नाहीं . ] देखिजेत [पं. देखिजे तें.] देशें राहातिया ॥ २ ॥ तुका ह्मणे माझी लाजविली सेवा हीनपणें देवा जिणें जालें ॥ ३
५५८. काय म्यां मानावें [पं. कथेचें हें फळ.] हरिकथेचें फळ । तरिजे सकळ [पं. जन.] जनीं ऐसें ॥ १ ॥ ध्रु.॥ उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र [क. परचक्रे. (क्रें?) ] ॥ ६ ॥ पापाविण नाहीं पाप येत पुढें । [दे. क. साक्षसी.] साक्षीसी रोकडें साक्ष आलें ॥ २ ॥ तुका ह्मणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥ ३ ॥
५५९. भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुह्मी दातारा नेणां ऐसें ॥ ६५ ॥ भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥ २ ॥ तुका ह्मणे नाहीं आघाताचा वारा । ते स्छळीं दातारा [त. ठेवीं मज. ] ठाव मागें ॥ ३ ॥
५६०. फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥ १ ॥ पायरी प्रतिमा एक चि पाषाण परि तें महिमान वेगळालें ॥ २ ॥ तुका ह्मणे तैशा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥ ३ ॥
५६१. कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति [क. प्रीति ] पावे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आतां माझा श्रोता वक्ता तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च म्यां [दे. क. त. मां.] कुशळ चतुर येथें न [पं. पवती. क. सरतें.] सरते । करितील [पं. करितील रीति तर्क मत. क. करितील रितें तर्क मतें. ] रिते तर्क मतें ॥ २ ॥ तुका ह्मणे [पं. केणें जालें. त. जालें केणें.] जालें पेणें एके घरीं । मज आणि हरी तुह्मां गांठी ॥ ३ ॥
५६२. आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण दखोवेखीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ न कळे [(स्वतंत्र?) संतत हा शब्द कांहींसा बरा लागेल.] सतंत हिताचा विचार तो हे दारोदार खाती फेरे ॥ ६ ॥ वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥ २ ॥ तुका ह्मणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥ ३ ॥
५६३. दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे [पं. तो ] हा विचार अघटित ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ विष्णुदास आह्मी न [त. भों.] भ्यों कळिकाळा । भुलों मृगजळा न घेडे तें ॥ ६६ ॥ उधळितां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥ २ ॥ तुका ह्मणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि ॥ ३ ॥
५६४. नटनाट्यें [पं. क. नटनाट्य.] अवघें संपादिलें सोंग। भेद [पं. दावी.] दाऊं रंग न पालटे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मांडियेला खेळ कौतुक [क. कौतुकें. पं. कवतुकें. ] बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ ६६ ॥ स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥ २ ॥ तुका ह्मणे आह्मी या जनाविरहित होउनि निश्चित [पं. निश्चित. ] क्रीडा करूं ॥ ३ ॥
५६५. तुजविण [त. पं. क. याणी.] वाणीं आणिकांची [पं. आणिकाची. ] थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ ६६ ॥ नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि घडी चांडाळ [त. हैं . ] हे ॥ २ ॥ कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥ ३ ॥ तुका ह्मणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥ ४ ॥
स्वामींचे स्त्रीनें स्वामींस कठिण उत्तरें केलीं - अभंग ७.
५६६. मज चि भोंवता केला [त. घेतलासे जोग. ] येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥ ४५ ॥ कोणाची बाईल होऊनियां वोढुं । संवसारी काढूं आपदा किती ॥ २ ॥ काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥ ३ ॥ कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥ ४ ॥ तुका ह्मणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुं माथां ॥ ५ ॥
५६७. काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरीं ॥ ६६ ॥ झवे आपुली आई काय माझें केलें । धड या विठ्ठलें संसाराचें ॥ २ ॥ तुका ह्मणे येती बाईले असडे [पं. आसडे. ] । फुंदोनियां रडे हांसे कांहीं ॥ ३ ॥
५६८. गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ भरी लोकांची पांटोरी । मेला चोरटा खाणोरी ॥ ६६ ॥ खवळली पिसी । हाता झोंबे [पं. लांसी जैसी.] जैसी लांसी ॥ २ ॥ तुका ह्मणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥ ३ ॥
५६९. आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलासी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ डोचकें तिंबी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ ६ ॥ आपल्या पोटा केली थार | आमचा नाहीं येसपार ॥ २ ॥ हातीं टाळ तोंड वासी । गाय देउळीं देवापासीं ॥ ३ ॥ आतां आह्मी करूं काय । न वसे घरीं राणा जाय ॥ ४ ॥ तुका ह्मणे आतां धीरी । आनि [पं. जालें नाहीं.] नाहीं जालें तरी ॥ ५ ॥
५७०. वरें जालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आतां खाईन पोटभरी । ओल्या कोरड्या भाकरी ॥ ४५ ॥ किती तरी तोंड याशीं वाजवूं मी रांड ॥ २ ॥ तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥ ३॥
५७१. न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ उठितें तें [पं. कुटी.] कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ ६५ ॥ जिवंत चि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥ २ ॥ संसाराकडे न पाहाती ओस पडे ॥ ३ ॥ तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥ ४ ॥ तुका ह्मणे बरें जालें । घे गे बाइले लीहिलें ॥ ५ ॥
५७२. कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ देवासा जालें ब्रह्मांड सोइरें। कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥ ४९ ॥ मानें पाचारितां [पं नाहीं.] नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाठीं ॥ २ ॥ तुका ह्मणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसें श्वान [दे. पाठीं लागे.] लागे पाठीं ॥३ ॥
५७३. भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुच्छ [दे. पुंस. पं. पुस.] । खापरा परीस काय करी ॥ ६६ ॥ काय करिल तया साकरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥ २ ॥ तुका ह्मणे वज्र भंगें [पं. भेदे. ] एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥ ३ ॥
५७४. इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ ६५ ॥ मुकियाचे परी जीवीं । साकर जेवीं खादली [त. खादल्या. ] ॥ २ ॥ तुका ह्मणे काय बोलें । आतां भलें मौन्य ची ॥ ३ ॥
५७५. साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ ६६ ॥ देवभाग्यें घरा येती संपत्ती त्या सकळा ॥ २ ॥ तुका ह्मणें तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥ ३ ॥
५७६. आह्मासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ ६६ ॥ कोठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ॥ २ ॥ सुख ठेवी आह्यासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥ ३ ॥ आह्मां घाली पाठीकडे । [पं. आपण.] पुढें कळिकाळाशीं भिडे ॥ ४ ॥ तुका ह्मणे कृपानीधी । आह्मां उतरीं नांवेमधीं ॥ ५ ॥
५७७. रवि रश्मिकळा । नये काढितां निराळा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तैसा आह्मां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ ६६ ॥ गोडी साकरेपासुनी । कैसी निवडती दोन्ही ॥ २ ॥ तुका ह्मणे नाद उठी। विरोनि जाय नभा पोटीं ॥ ३ ॥
५७८. थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ घ्यावें जेणें नये तुटी। बीज वाढे बीजा पोटीं ॥ ६५ ॥ चित्त ठेवीं ग्वाही । आणिकांशी चाड नाहीं ॥ २ ॥ आपलें तें हित फार । तुका ह्मणे खरें सार ॥ ३ ॥
५७९. अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ह्मणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ ६६ ॥ ऊंस कांदा एक आळां । स्वाद गोडीचा [त. पं. पाहतां.] निराळा ॥ २ ॥ तुका ह्मणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥ ३ ॥
५८०. शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ह्मणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ ६६ ॥ खवळलिया कामक्रोधीं । अंगीं भरती आधिव्यापी ॥ २ ॥ तुका ह्मणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥ ३ ॥
५८१. गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥ १ ॥ ॥ध्रु. ॥ आतां भजों कवणे [पं. कोणे.] परी । देव सबाह्य अंतरीं ॥ ५ ॥ उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥ २ ॥ हेम अळंकारा नामीं । तुका ह्मणे तैसे आह्मी ॥ ३ ॥
५८२. परमेष्ठिपदा । तुच्छ [त. तुष्य.] करिती सर्वदा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ हें चि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ ६ ॥ इंद्रपदादिक भोग भोग नव्हे तो भवरोग ॥ २ ॥ सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥ ३ ॥ पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥ ४ ॥ योगसिद्धिसार । ज्यासि वाटे तें असार ॥ ५ ॥ मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥ ६ ॥ तुका ह्मणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥ ७ ॥
५८३. मोहोऱ्याच्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें [क तें.] ते साक्ष ॥ ६६ ॥ स्वामीचिया [पं. स्वप्नींचिया. ] अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥ २ ॥ तुका ह्मणे खोडी | देवमनी [दे. क. देवमणी.] न देती दडी ॥ ३ ॥
५८४. मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ वैस सांडोनि दिमाख । जाय काळें • मुख ॥ ६ ॥ येथें न सरे चार हीण आणीक वेव्हार ॥ २ ॥ तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥ ३ ॥
५८५. भाव देवाचें [त. पं. देवाचे. ] उचित । भाव तोचि भगवंत ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ धन्यधन्य शुद्ध जाती । संदेश कैंचा तेथें चित्तीं ॥ ६६ ॥ बहुत वराडी । देवजवळी [पं. देवावरी.] आवडी ॥ २ ॥ तुका ह्मणे हें रोकडें । लाभ अधिक रिचो खडें ॥ ३ ॥
५८६. गौरव गौरवापुरतें। फळ सत्याचे [पं. सत्यच संकल्पे.] संकल्प ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ कठिण योगाहुन क्षे [दे. क्षम.] । ओकलिया होतो श्रम ॥ ५ ॥ पावलें मरे सिवेपाशीं । क्लेश [पं. उतर ते.] उरत ते क्लेशीं ॥ २ ॥ तुका बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥ ३ ॥
५८७. न संडी अवगुण । [क. वर्म.] वर्भे मानीतसे सिण ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ भोग देतां करिती काई । फुटतां यमदंडें [पं. यमदंड.] डोई ॥ ६ ॥ पापपुण्यझाडा | देतां तेथें मोटी पीडा ॥ २ ॥ तुका ह्मणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥ ३ ॥
५८८. पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अविटाचा केला संग। सर्व भोगी पांडुरंग ॥ ६५ ॥ आइता च पाक । संयोगाचा सकळिक ॥ २ ॥ तुका ह्मणे धणी । सीमा राहिली होउनी ॥ ३ ॥
५८९. दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख [पं. विन्मुख. ] ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ झाडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ ६६ ॥ सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥ २ ॥ तुका ह्मणे पडिला वाहो । कैसा [पं. पाहो.] पाहा हो [पं. हा शब्द नाहीं. ] लटिक्याचा ॥ ३ ॥
५९०. वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ जिंकोनियां अहंकार | पावटणी केलें शिर ॥ ६५ ॥ काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥ २ ॥ तुका ह्मणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥ ३ ॥
५९१. झाड कल्पतरु । न करी याचकीं आव्हेरु ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुह्मी सर्वी सर्वोत्तम। ऐसे विसरतां धर्म [त. पं. नाम.] परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥ २ ॥ गाऱ्हाण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥ ३ ॥
५९२. वसवावें घर | देवें बरें निरंतर ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ ६५ ॥ संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥ २ ॥ तुका ह्मणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥ ३ ॥
५९३. येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ घरीं देवाचे अबोला । [दे. त्याची. ] त्यासि ते चिसवे त्याला ॥ ६ ॥ नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च तें रितें [दे. ते रित. ] ॥ २ ॥ तुका ह्मणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥ ३ ॥
५९४. करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ देव [त. पं. तरी ते.] सारावे परते । संत पूजावे आरते ॥ ६५ ॥ शाळिग्राम विष्णुमूर्ती | संत हो का भलते याती ॥ २ ॥ तुका ह्मणे संधी। अधिक वैष्णवांची मांदी ॥३॥
५९५. ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ करितां स्वामीसवें वाद [पं. पाद.] । अधिक अधिक आनंद ॥ ६५ ॥ असावा तो धर्म | मग साहों जातें वर्म ॥ २ ॥ वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥३॥
५९६. देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ते चि येतील ढेंकर | आनंदाचें हरिहर ॥ ५ ॥ वेधी आणिकांस | ऐसा जया अंगीं कस ॥ २ ॥ तुका ह्मणे भुक । येणें न लगे आणीक ॥ ३ ॥
५९७. नाम साराचें ही सार शरणागत यमकिंकर ॥ १ ॥ ध्रु. ॥ उतमाउतम [पं. नाम उत्तम उत्तम. क. उत्तम उत्तम.] । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ ५ ॥ नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हाकोळी ॥ २ ॥ तुका ह्मणे वर्णं काय । तारक विठोबाचे पाय ॥ ३ ॥
५९८. गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ ६५ ॥ मुखें ह्मणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥ २ ॥ तुका ह्मणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥ ३ ॥
५९९. द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ माय त्यासि व्याली जेव्हां । रांड [त. राणसटवी. दे. "रांड" असें असतां वर "रान" हा शोध घातला आहे.] सटवी नव्हती तेव्हां ॥ ४५ ॥ कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥ २ ॥ भोग [पं देतां स्त्रियेसि.] स्त्रियोसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥ ३ ॥ तुका ह्म जाण । नर गाढवाहुनी हीन ॥ ४ ॥
६००. सुखें बोले ब्रह्मज्ञान । मनीं धनअभिमान [त. आणि मान. ] ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐशियाची करी सेवा | काय सुख होय जीवा ॥ ६५ ॥ पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥ २ ॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥ ३ ॥ [ पं. करितां.]