संत तुकाराम गाथा - अभंग क्रमांक ३०१ ते ४०० | Sant Tukaram Gatha Abhang 301 to 400

संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक ३०१ ते ४००. येथे आम्ही सार्थ तुकाराम गाथा चे अभंग संग्रह करण्याचा प्रयत्न केला आहे.
संत तुकाराम गाथा - अभंग क्रमांक ३०१ ते ४००

विटूदांडू - अभंग १.

३०१. माझें ह्मणतां याला कां [पं. कांहीं.] रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥ १ ॥ कोणी सोडवी ना काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥ २ ॥ तुका ह्मणे किती सांगावें चांडाळा | नेणे जीवकळा [पं. जीवनकळा. ] कोण्या जीतो ॥ ३ ॥

३०२. आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥ १ ॥ रोग्या विषतुल्य लागे हैं। मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥ २ ॥ तुका ह्मणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन [पं. सर्व.] अवघें खोटें ॥ ३ ॥

३०३. छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ ६६ ॥ नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥ २ ॥ तुका ह्मणे याति । भ्रष्ट तयाची [पं. हो का तयाची भलती.] ते मति ॥ ३ ॥

३०४. बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मिठेंविण काय करावें मिष्टान्न [पं. पक्वान्न.] । शव जीवेंविण शृंगारिलें ॥ ६६ ॥ संपादर्णाविण विटंबिलें सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥ २ ॥ कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिकें द्रव्य तरी ॥ ३ ॥ तुका ह्मणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥ ४ ॥

३०५. अंगीं ज्वर तया नावडे साकर जन तो इतर गोडी जाणे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ एकाचिये तोंडीं पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ ४५ ॥ चारितां बळें येत असे दांतीं । मागोनियां घेती भाग्यवंत ॥ २ ॥ तुका ह्मणे नसे संचित हैं बरें । तयासि दुसरें काय करी ॥ ३ ॥

३०६. धिग जीणें तो बाईले आधीन । परलोक मान नाहीं दोन्ही ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ ६६ ॥ धिग जीणें आळस निद्रा जया फार अमित आहार अघोरिया ॥ २ ॥ धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥ ३ ॥ तुका ह्मणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥ ४ ॥

३०७. अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥ १ ॥ ॥ध्रु. ॥ मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ ४५ ॥ विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥ २ ॥ अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥ ३ ॥ तुका ह्मणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें। फुकट जासी ठकोनी ॥ ४ ॥

३०८. अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुलाल्या मतीं पाषांडिया ॥ ६५ ॥ जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥ २ ॥ तुका ह्मणे संतीं भाव केला बळी न कळतां खळीं दूषिला [पं. दूषिलें देवां.] देव ॥३ ॥

३०९. एक तटस्थ मानसीं एक सहज चि आळसी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ दोन्ही दिसती सारिखीं। वर्म जाणे तो पारखी ॥ ६५ ॥ एक ध्यानीं करिती जप एक बैसुनि घेती झोप ॥ २ ॥ एकां सर्वस्वाचा त्याग । एकां पोटासाठीं जोग ॥ ३ ॥ एकां भक्ति पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥ ४ ॥ वर्म पोटीं एका । फळें दोन हाणे तुका ॥ ५ ॥

३१०. काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ ६६ ॥ देखिलें तें दृष्टी मागे घालूनियां मिठी ॥ २ ॥ तुका ह्मणे भावें । माझ्या मज समजावें ॥ ३ ॥

३११. भजन घाली भोगावरी । अकर्तव्य [पं. अतर्क्य तें] मनीं धरी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ ६६ ॥ नाहीं वैराग्याचा लेश | अर्थचाड जावें [पं. तं. जीवे आस.] आस ॥ २ ॥ हें ना तें सें जालें | तुका ह्मणे वांयां गेलें ॥ ३ ॥

३१२. एकादशीस अन्न पान । जे नर करीती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐका व्रताचें महिमान नेमें आचरती जन गाती ऐकती हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ ४५ ॥ अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा [पं. भक्षितो.] भक्षितां तांबूल । सांपडे सबळ काळाहात्तीं न सुटे ॥ २ ॥ सेज वाज विलास भोग । करी कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥ ३ ॥ आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा त्याच्या पापें जाणा ठेंगणा महा मेरु ॥ ४ ॥ तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका ह्मणे व्रत एकादशी चुकलीया ॥ ५ ॥

३१३. करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ शुद्धबुद्धि होय [पं. दोघां होय.] दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ ६६ ॥ आपुलें देऊनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥ २ ॥ देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥ ३ ॥ तुका हाणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडूं नये ॥ ४ ॥

३१४. इनामाची भरली पेठ | वाहाती दाट मारग ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अवघेचीं येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ ६५ ॥ अडचणी त्या केल्या दुरी देण्या उरी घेण्याच्या ॥ २ ॥ तुका ह्मणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥ ३ ॥

३१५. वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ ६५ ॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥ २ ॥ तुका ह्मणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥ ३ ॥

३१६. विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंत ॥ ६५ ॥ बहु अतिशय खोटा । तर्के होती बहु वाटा ॥ २ ॥ तुका ह्मणे भावें । कृपा करीजेते देवें ॥ ३ ॥

३१७. येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ३१७. ॥ ६५ ॥ येथीचिया नाशवंतें काय रितें चाळवूं ॥ २ ॥ तुका ह्मणे वैष्णव जन माझे गण समुदाय ॥ ३ ॥

३१८. उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ ६५ ॥ तरी मनीं नाहीं शंका | बळें एका स्वामीच्या ॥ २ ॥ तुका ह्मणे नये आह्मां । पुढें कामा गबाळ ॥ ३

३१९. बोलावें तें धर्मा मिळे | बरे डोळे उघडूनि ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ ४६ ॥ दुजें ऐसें काय बळी जें या जाळी अग्नीसि ॥ २ ॥ तुका ह्मणे शर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥ ३ ॥

३२०. बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ ६५ ॥ विद्या असती कांहीं तरी पडतों अपायीं ॥ २ ॥ सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥ ३ ॥ गर्व होता ताठा जातों यमपंथें वाटा ॥ ४ ॥ तुका ह्मणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥ ५ ॥

३२१. दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ ६५ ॥ देखती जे डोळे रूप आपुलें तें खेळे ॥ २ ॥ तुका ह्मणे नाद | जाला अवघा गोविंद ॥ ३ ॥

३२२. कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुह्मी दयावंत कैसे कीर्ति जगामाजी [पं. असे.] वसे ॥ ६५ ॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥ २ ॥ तुका ह्मणे देवा । माझा करावा कुठावा [पं. कुडावा. ] ॥ ३ ॥

३२३. ठायींची ओळखी । येइल टाकूं टाका सुखीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुमचा जाईल ईमान | माझे कपाळीं पतन ॥ ६५ ॥ ठेविला तो ठेवा | अभिलाषें बुडवावा ॥ २ ॥ मनीं न विचारा । तुका ह्मणे हे दातारा ॥ ३ ॥

३२४. तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ रूप कासवाचे परी । धरुनि [पं. राहिलों.] राहेन अंतरीं ॥ ६५ ॥ नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥ २ ॥ तुका ह्मणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥ ३ ॥

३२५. गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ ६५ ॥ कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥ २ ॥ तुका ह्मणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥ ३ ॥

३२६. पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांचीं नांवें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नेघे [पं. माझी वाचा.] माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ ६६ ॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥ २ ॥ तुका [वे. त. तुका ह्मणे जपें संताचिया पापें.] ह्मणे पापें । जाती संतांचिया जपे ॥ ३ ॥

३२७. देव होईजेत (पं. होईजेते.] देवाचे संगती पतन पंगती जगाचिया [पं. देवाचिया. ] ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ ६६ ॥ दाखविले परी नाहीं वर्जिजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥ २ ॥ तुका ह्मणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥ ३ ॥

३२८. शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु जाले तट ॥ ६५ ॥ लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया [पं. घरी.] धरी ॥ २ ॥ तुका ह्मणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥ ३ ॥

३२९. वैद्य [वे. त. वैद.] वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी [पं. "अंगीं दैवत संचरे । मग तेथें काय उरे" । हें कडवें जास्त आहे. ] नवसें कन्यापुत्र हाती ॥ तरि कां करणें लागे पती ॥ २ ॥ जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दातार ॥ ३ ॥

३३०. मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ [पं. ऐसी गर्जती पुराणें । नका जाऊं आड राणें.] नका जाऊं आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ ६६ ॥ चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥ २ ॥ झळकती पताका । गरुड टके ह्मणे तुका ॥ ३ ॥ 

३३१. कार्तिकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आलें वैकुंठ जवळां । [पं. पंढरीचे सन्निध.] सन्निध पंढरी ॥ १ ॥ ॥ध्रु.॥ पीक पिकले घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ ६६ ॥ चालती स्थिर स्थिर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर | टाळ श्रुति मृदंग ॥ २ ॥ मिळालिया भद्रजाती । कैशा आनंदें [पं. डुल्लती.] डुलती। शूर उठावती । एका एक आगळे ॥ ३ ॥ नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आलें वैष्णवदळ | कळिकाळ कांपती ॥ ४ ॥ आस करिती ब्रह्मादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक । ह्मणती [पं. भाग्याचा कैसा.] भाग्याचे कैसे ॥ ५ ॥ मरण मुक्ति वाराणसी। पितृऋण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोबाच्या ॥ ६ ॥ तुका ह्मणे आतां । काय करणें आह्मां चिंता । सकळ सिद्धींचा दाता। तो सर्वथा नुपेक्षी ॥ ७ ॥

३३२. जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी [पं. पद्माळेसी.] विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं [पं. वेणुनाद.] ॥ ६६ ॥ सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निर्विकार होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥ २ ॥ नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जयां । जे पंढरपूर [पं. पंढरी.] देखती ॥ ३ ॥ उपजोनि संसारीं । एक वेळ [पं. पाहे पंढरी.] पाहें पा पंढरी। महा दोषां कैची उरी । देवभक्त देखिलिया ॥ ४ ॥ ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी । सुदर्शन घरटी करी। रीग न पुरे कळिकाळा ॥ ५ ॥ तें सुख वर्णावया गति । एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥ ६ ॥ तुका ह्मणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । अधम जन्मांतरिचा । तया पंढरी नावडे ॥ ७ ॥

३३३. एक नेणतां नाडलीं । एकां जाणिवेची भुली ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ ४५ ॥ दोहीं सवा नाड | विहीर एकीकडे आड ॥ २ ॥ तुका ह्मणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥ ३ ॥

३३४. ह्मणवितों दास । [पं. एवढी च मज आस.] मज एवढी च आस ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ परी तें अंगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ ६५ ॥ बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥ २ ॥ तुका ह्मणे बरां । दावूं जाणतों पसारा ॥३॥

३३५. पूजा समाधानें [पं. समाधान]। अतिशयें [पं. वाटे. ] वाढे सीण ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ हें तों जाणां तुह्मी संत | आहे बोलिली ते नीत ॥ ६५ ॥ पाहिजे तें केलें । सहज प्रसंग घडलें ॥ २ ॥ तुका ह्मणे माथा । पायीं ठेवीं तुह्मां संतां ॥ ३ ॥

३३६. स्वप्नींचिया गोष्टी मज धरिलें होतें वेठी। जालिया सेवटीं [पं. सेवटी.] । जालें लटिकें सकळ ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ वायां भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा राव रंक राणा । कैंचे स्थानावर आहे ॥ ६५ ॥ सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥ २ ॥ तुका ह्मणे संतीं । सावचित केलें अंतीं नाहीं तरि होती टाळी बैसोनि राहिली ॥ ३ ॥

३३७. आसुरी स्वभाव निर्दय अंतर मानसीं निष्ठुर अतिवादी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ ४६ ॥ काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग | अंगाचेंच अंग साक्षी देतें ॥ २ ॥ तुका ह्मणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांटविलें ॥ ३ ॥

३३८. बाळपणीं हरि । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बाळ चांगलें वो बाळ चांगलें वो । ह्मणतां चांगलें | वेळ लागे तया बोलें। जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥ ६५ ॥ मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती । नाहीं आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं । विसरल्या घरें । तान्हीं पारठीं लेकुरें । धा सांडोनियां येरें । तान भूक नाहीं ॥ २ ॥ एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे । लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥ ३ ॥ वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या । कुमर कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥ ४ ॥ वैरभाव नाहीं । आप पर कोणीं कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं । तुका ह्मणे सुखी । केलीं आपणासारिखीं। स्वामी माझा कवतुकें | बाळवेपें खेळे ॥ ५ ॥

३३९. अशोकाच्या [पं. त. वासुगीच्या.] बनीं सीता शोक करी । कांहो अंतरले रघुनाथ दुरी । येउनि गुंफेमाजी दुष्ट केली चोरी । कांहो मज आणिलें अवघड लंकापुरी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ । मन उताविळ जाला दुरी पंथ । राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ ६ ॥ काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें । गाईवत्सा पत्नीपुरुषा बिघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥ २ ॥ नाडियेलें आशा मृगकांतिसोनें । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें । उलंघिली आज्ञा माव काय मी जाणें देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥ ३ ॥ नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये| उपटी पक्षिया एक देउनि पाये। उदकवेढ्यामध्यें तेथें चाले काये ॥ ४ ॥ जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी ॥ संमोखी त्रीजटा स्छिर स्छिर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥ ५ ॥

३४०. वीट नेघे ऐसें रांधा। जेणें बाधा उपजे ना ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तरी च तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ ६६ ॥ आणिकां गुणां पोटीं बाब | दावी भाव आपुला ॥ २ ॥ तुका ह्मणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥ ३ ॥

३४१. नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ पडिला नामाचा विसर | वाढविला संवसार ॥ ४२ ॥ लटिक्याचें पुरीं । वाहोनियां गेलों दुरी ॥२॥ तुका ह्मणे नाव आह्मां सांपडला भाव ॥ ३ ॥

३४२. अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आपुलालें तुह्मी करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ ४५ ॥ देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांठवण घरोघरीं ॥ २ ॥ देखोनियां छाया सुख न पवीजे। जंव न बैसीजे तया तळीं ॥ ३ ॥ हित [पं. सुख.] तरी होय गातां अईकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥ ४ ॥ तुका ह्मणे होसी भावें चि तूं मुक्त काय करिसी युक्त जाणिवेची ॥ ५॥

३४३. काय उणें आह्मां विठोबाचे पाईं। नाहीं ऐसें [पं. कांहीं.] काई येथें एक ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तें [पं. तों. ] हैं भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ ६६ ॥ कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥ २ ॥ तुका ह्मणे मोक्ष विठोबाचे गांवीं। फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥ ३ ॥

३४४. सेवितों [पं. सेवितों हा रस.] रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ विटेवरी ज्याचीं पाउलें समान तो चि एक दानशूर दाता ॥ ६५ ॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥ २ ॥ तुका ह्मणे मज धाडिलें निरोपा। मारग हा सोपा सुखरूप ॥ ३ ॥

३४५. ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु [पं. बंधु.] । जे कां सच्चिदानंदीं नित्यानंदु | जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥ १ ॥ ॥ध्रु. ॥ भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुद्धि नास्तिक्यभेदु [वै. नास्ति भेदु.] । भूतकृपा मोडीं द्वेषकंदु | शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ ६६ ॥ मन बुद्धि काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥ २ ॥ अर्थकामचाड नाहीं चित्ता [दे. चिंता. ] । मानामान मोह माया मिथ्या । वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु मेट देती तया अवचिता रे ॥ ३ ॥ मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका ह्राणे जो विटला जाणीवेस रे ॥ ४ ॥

३४६. भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥ १ ॥ ॥ध्रु.॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी। भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ ६५ ॥ सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥ २ ॥ भुक्तिमुक्तीची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता । तुका ह्मणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥ ३ ॥

३४७. जें [पं. जे का रंजले गांजले । त्यांसि ह्मणे जो आपुले ;] कां रंजले गांजलें । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ ६५ ॥ मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥ २ ॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो त्हृदयीं ॥ ३ ॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥ ४ ॥ तुका ह्मणे सांगूं किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥ ५॥

३४८. याजसाठीं भक्ति । जगीं [पं. वाढवाया.] रूढवावया ख्याति ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ ६५ ॥ गौरव [पं. गौरवावया. ] यासाटीं। स्वामिसेवेची कसोटी ॥ २ ॥ तुका ह्मणे अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥ ३ ॥

३४९. अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ ६५ ॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥ २ ॥ तुका ह्मणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥ ३ ॥

३५०. कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ ४५ ॥ कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥ २ ॥ तुका ह्मणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥ ३ ॥

३५१. आचरणा ठाव । नाहीं अंगीं स्वता भाव ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ ६५ ॥ श्वानाचियापरी । मिष्टान्नासि विटाळ करी ॥ २ ॥ तुका ह्मणे ऐसा सटवे चि ना पांचा दिसां ॥ ३

३५२. गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ व्याली कुन्हाडीचा दांडा । वर न घली च तोंडा ॥ ४५ ॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥ २ ॥ तुका ह्मणे जाय । नरका अभक्ताची माय ॥ ३ ॥

३५३. पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीतीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ ६५ ॥ सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥ २ ॥ तुका ह्मणे दुरी राखतां हे तों ची बरी ॥ ३ ॥

३५४. देव आड जाला। तो भोगिता मी उगला अवघा निवारला शीण शुभाअशुभाचा ॥ १ ॥ ॥ध्रु.॥ जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया [पं होतें कवतुकें.] कौतुकें कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ ४५ ॥ विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग वर्णधर्म हा खेळ तयाचा [पं. हा शब्द नाहीं.] ॥ २ ॥ अवघी एकाची च वीण [पं. विईण. ] । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥ ३ ॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा [पं. निरोपी ] ॥ ४ ॥

मंबाजी गोसावी यांनी स्वामीस पीडा केली - अभंग.

३५५. न [पं. नसोडी न सोडी।.] सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥ १ ॥ ॥ध्रु.॥ भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ ६६ ॥ शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥ २ ॥ तुका ह्मणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ॥ ३ ॥

३५६. बरवें बरवें केलें विठोबा बरवें । [पं. पाहोनियां.] पाहोनि आंत क्षमा अंगी कांटीवरी मारविलें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥ २ ॥ तुका ह्मणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतलें रे ॥ ३ ॥

३५७. पावलों [त. पावलों पावलों पावलों.] पावलों । देवा पावलों रे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बरवें संचित होतें तैसें जालें रे । आतां काय बोलों रे ॥ २ ॥ सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों रे । तुका ह्मणे करूनि वेगळा केलों रे ॥३॥

३५८. कां होती कां होती । देवा एवढी फजीती ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मुळीं वर्म नसतों [पं नसतें. ] चुकलों । तो मी ऐसें चित्तीं ॥ ६६ ॥ होणार होऊनि गेलें । मिथ्या आतां [पं. खंती.] खंती रे ॥ २ ॥ तुका ह्मणे पुरे आतां । दुर्जनाची संगती [पं. हा शब्द नाहीं. ] ॥ ३ ॥

३५९. सोडवा [पं. सोडवा सोडवा हो अनंता । त. सोडवा सोडवा सोडवा सोडवा हो अनंता.] सोडवा सोडवा हो अनंता ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुजविण ऐसा कोण दुजा प्राणदाता ॥ ६६ ॥ कोणा लाज नेणां ऐसें [पं. ऐसी.] । आणिकां शरण [पं. तुह्मी.] आह्मी जातां ॥ २ ॥ तुका ह्मणे सखया । माझ्या रखुमाईच्या कांता ॥ ३ ॥

३६०. पुत्राची वारता [वे. त. वार्ता.] शुभ ऐके जेवीं माता ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तैसें राहो माझें मन । गातां ऐकतां हरिगुण ॥ ४५ ॥ नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥ २ ॥ तुका ह्मणे पाहे कासवीचें पिलें माये

३६१. ध्यानी योगीराज बैसले कपार्टी लागे पाठोवांठीं [पं. पाटोवाटी.] तयांचिया ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥ ६५ ॥ कोण सखें तयां आणीक [पं. सोइरें] सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥ २ ॥ कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥ ३ ॥ तुका ह्मणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥ ४ ॥

३६२. न व्हावें तें जालें [पं. देखिले हे.] देखियेले पाय । आतां फिरूं काय मागें देवा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बहु दिस होतों करीत हे आस । तें आलें सायासें फळ आजि ॥ ४५ ॥ कोठवरि जिणें संसाराच्या [पं. संसाराची. ] आशा । उगवो हा फांसा येथूनियां ॥ २ ॥ बुडालीं तयांचा मूळ ना मारग । [पं. लागला तो लाग सोडूनियां.] लागे तो लाग सांडूनियां ॥ ३ ॥ पुढें उलंघितां दुःखाचे डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥ ४ ॥ तुका ह्मणे कास धरीन पीतांबरीं । तूं भवसागरीं तारूं देवा ॥ ५ ॥

३६३. वैकुंठा जावया तपाचे सायास करणें जीवा नास न लगे कांहीं ॥ १ ॥ तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया [पं. हरावया. ] भार पृथीवीचा ॥ २ ॥ तुका ह्मणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवरी

३६४. शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ येथें केले नव्हे काई । लंडीपण खोटें भाई ॥ ६५ ॥ करिती होया होय । परी नव्हे कोणी साह्य ॥ २ ॥ तुका ह्मणे घडी । साधिलिया एक थोडी ॥ ३ ॥

३६५. हाणउनी खेळ मांडियेला ऐसा नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ [पं. माझिया गोतें बसलें सकळ.] माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ ६६ ॥ करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥२॥ तुका ह्मणे नाहीं काळापाशीं गोवा स्थिति मति देवा वांचूनियां ॥ ३ ॥

३६६. वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ ६५ ॥ पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं [पं. निर्धारी ] ॥ २ ॥ तुका ह्मणे याती हो का तयाची भलती ॥ ३

३६७. करोत तपादि साधनें । कोणी [पं. साधोत.] साधो गोरांजनें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आह्मी नवजों तथा वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ ६६ ॥ पावोत आत्मस्थिति । कोणी [पं. कोणी उत्तम ह्मणोत मुक्ति.] ह्मणोत उत्तम मुक्ति ॥ २ ॥ तुका ह्मणे छंद । आह्मां हरिच्या दासां निंद्य ॥ ३ ॥

॥ स्वामीस सद्गुरूची कृपा जाली - अभंग ४.

३६८. सद्गुरुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ ६५ ॥ भोजना मागती तूप पावशेर पडिला विसर स्वप्नामाजी ॥ २ ॥ कांहीं कळे उपजला अंतराय । ह्मणोनियां काय त्वरा जाली ॥ ३ ॥ राघवचैतन्य केशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ॥ ४ ॥ बाबाजी [पं. आपण.] आपलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥ ५ ॥ माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका ह्मणे ॥ ६ ॥

३६९. माझिये मनींचा जाणोनियां भाव तो करी उपाव गुरुराजा [पं. गुरुरावो. ] ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नव्हे गुंपा [पं. गुंफा.] कांहीं कोठें ॥ ४५ ॥ जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥ २ ॥ जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी नापे पेटीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥ ४ ॥

३७०. घालुनियां भार राहिलों निश्चितीं । निरविलें संतीं विठोबासि ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ लावूनियां हातें कुरवाळला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ ६६ ॥ कटीं कर सम चरण साजिरे। राहिला भीवरे तीरीं उभा ॥ २ ॥ खुंटले सायास [पं. आणीक ] अणिकि या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥ ३ ॥ तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका ह्मणे संता लाज माझी ॥ ४ ॥

३७१. माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालों आतां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ ६५ ॥ ठायींचा संबंध तुज मज होता। विशेष अनंता केला संतीं ॥ २ ॥ जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हें [पं. त. हे. ] चि आतां नाहीं लाज तुम्हां ॥ ३ ॥ तुका ह्मणे संतीं घातला हावाला । न सोडीं विठ्ठल पाय [पं. तुझे. ] आतां ॥ ४ ॥

३७२. देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ ४६ ॥ देवाची जतन । तया बाधूं न शके अग्र ॥ २ ॥ तुका ह्मणे हरी । प्रहादासि यत्न करी ॥ ३ ॥

३७३. भले ह्मणवितां [दे. क. भणवितां.] संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ ६६ ॥ पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोई तें तेव्हां गोड ॥ २ ॥ तुका ह्मणे बरे सांगतां चि गोष्टी रणभूमि दृष्टी न पडे तों ॥ ३ ॥

३७४. संतसमागम एखादिया परी राहावें त्याचे [पं. घरीं.] द्वारीं श्वानयाती ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचें ॥ ४२ ॥ कामारी बटीक सेवेचे सेवक दीनपण [पं. दीन तेथें रंकपण भलें.] रंक तेथें भलें ॥ २ ॥ तुका ह्मणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांचिया ॥ ३ ॥

३७५. एकली राणागोविंदा सवें गेलें ठावें तें जालें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मज न ह्मणा न ह्मणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ ४६ ॥ नव्हती देखिली म्यां वाट हाणोनि हा धीट संग केला ॥ २ ॥ भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥ ३ ॥ सलगी धरी पयोधर । साहाती करमुर सवें ॥ ४ ॥ आहेब मी गर्भीणपणें । हें सांगणें कां लागे ॥ ५ ॥ तुका ह्मणे सेवटा नेलें । संपादिलें उभयतां ॥ ६ ॥

३७६. होतें बहुत हैं दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं । व्हावी भेटी ते जाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ स्थिर स्थिर [पं. मजसीं.] मज चि साहे करा बहु कष्ट सोसल्या येरझारा । येथें आड मज न साहावे वारा देऊनि कपाट आलें तें दुसरें वारा वो ॥ ६६ ॥ मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी । नाहीं लौकिक स्मरला आवडी । आतां येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥ २ ॥ उदयीं उदय साधिला अवकाश । निश्चिंतीनें निश्चिती सावकाश । धरिये गोडी बहुत आला रस । तुका ह्मणे हा मागुता न ये दिवस वो ॥ ३ ॥

३७७. स्वयें सुखाचे जाले अनुभव एक एकीपाशीं सांगतील भाव अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव | सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल । एक मेघःशामें जलधर बोल । रसीं उताविळ हृदय सखोल वो ॥ ६५ ॥ एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं [पं. इतरी.] अंध बहिर हे प्रेतलोकाचारी [दे. प्रेत लोकां चारी] । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरीं वो ॥ २ ॥ स्तुति पराविया मुखें रुचिकर प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर । परस्परें हैं सादरा सादर । योग सञ्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥ ३ ॥ भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी । दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरि वो ॥ ४ ॥ तुका लाधला हें उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून । पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥ ५ ॥

३७८. आजि का वो तूं दिससी दुश्चिती । ह्मणी [पं. ह्मणे ] एका मन लगे तुझ्या चित्तीं । दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरि चित्तीं वो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सर सर परती जालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड । व्याली माग्र ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं जाला खंड वो ॥ ६५ ॥ होतें तैसें [पं. होते तैसे उमटले वरी.] तें उमटलें वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी। नाहीं मर्यादा निःसंग [त. निःशंक ] बावरी । [पं. मन हैं गोविंदी काम करी वो.] मन हैं गोविंदीं देह काम करी वो ॥ २ ॥ नाहीं करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिलें खावें। नाहीं अचळ सावरावा [वे. त. ठाव.] ठावे। देखों [पं देखौनुदासीन.] उदासीन तुज गे देहभावें [वे. देहभावें.] वो ॥ ३ ॥ कोठें नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवतीं बहुत दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥ ४ ॥ करी कवतुक खेळ खेळे कान्हा | दावी लाघव भांडवी सासुसुना [दे. सासा. ] । परां भक्ति हे शुद्ध तुह्मी जाणा । तुका ह्मणे ऐसें कळों यावें जना [पं. हे.] वो ॥ ५ ॥

३७९. भरिला उलंडूनि रिता करी घट मीस पाणियाचें गोविंदाची चट | चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तो चि नीट वो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ चाळा लावियेले [पं. लावियेला. ] गोप गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें । दावी बहुतांच्या बहुर्वेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ ६६ ॥ मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार उगा राहे कां मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥ २ ॥ धरिली खोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मशीं संगें। मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकीं पडिलीं तुझीं सोंगें रे [पं. वो ] ॥ ३ ॥ सुख अंतरींचें बाह्य ठसठसी । ह्मणे विनोद हा काय सोंग यासी । तुज मज काय सोयरीक ऐसी नंदानंदन या थोरपणें जासी रे ॥ ४ ॥ करी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचें बाह्य रंग [पं. जाणा.] जाना । मन मिनलें रे तुका ह्मणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥५॥

३८०. आजि नवल मी आलें येणें राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें नाहीं । अंगीं जडला [पं. मेग.] मग उरलें तें [पं. कांहीं.] काई । आतां राखतां गुमान भलें बाई वो ॥ ४५ ॥ बहुत कामें मज नाहीं आराणूक एक सारितो तों पुढें उभें एक आजि मी टाकोनि आलें सकळिक । तंव रचिलें आणिक [पं. कवतुक. ] कवतुक वो ॥ २ ॥ चिंता करितां हरिली नारायणें । अंगसंगें मिनतां [पं. आतां.] दोघेजणें सुखें निर्भर जालियें त्याच्या गुणें । तुका ह्मणे खुंटलें येणें जाणें वो ॥ ३ ॥

३८१. मै भुली घरजानी बाट । गोरस वेचन आयें हाट ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ कान्हा रे मनमोहन [पं. मोहन.] लाल । सब ही बिसरूं देखें गोपाल ॥ ६२ ॥ काहां पग डारूं देख आनेरा । देखें तों सब वोहिन घेरा ॥ २ ॥ हुं तो थकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥ ३ ॥

३८२. हरिबिन रहियां न जाये जिहिरा कबकी थाडी देखें राहा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ क्या मेरे लाल पं. जाल.] कवन चुकी भई । क्या मोहिपासिती बेर लगाई ॥ ६५ ॥ कोई सखी हरी जावे बुलावन बार हि डा उसपर तन ॥ २ ॥ तुका प्रभु कब देखें पाऊं। पासीं आऊं फेर न जाऊं ॥ ३ ॥

३८३. भलो नंदाजीको डिकरो। लाज [पं. राखलीन] राखीलीन हमारो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आगळ [पं. आवे. दे. आवि.] आवो देवजी कान्हा । मैं [पं. मे घर छाडी आहे ह्मणा.] घरछोडी आहे ह्याना ॥ ६ ॥ उनसुं कळना [त. दे. उन्हसुं कळना येतो भला.] नव्हे तो भला । खसम अहंकार दादुला ॥ २ ॥ तुकाप्रभु परबल [वे. पं. परवली. ] हरी । छपी आहे हुं जगाथी न्यारी ॥ ३ ॥

३८४. नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । [पं. न साहावे मज बहु होतो उबारा. ] करूं न साहती बहु होतो उबारा । मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा [पं. कुमारा वो. ] ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सखिया वेशिया तुह्मी प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा । उमटली अंगीं वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ॥ ६५ ॥ [पं. कळों नेदावी.] नये कळों नेदावी हे दुजियासि मात घडावा तयासी उत्कंठा एकांत । एकाएकीं साक्षी येथें आपुलें चित्त । कोण्या काळें होइल [पं. हे शब्द नाहींत. ] नेणों भाग्य उदित [त. उदीत.] वो [पं. हे शब्द नाहींत. ] ॥ २ ॥ स्वाद सीण देहभान निद्रा खंडन पाहिले तटस्छ उन्मळित लोचन । अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका ह्मणे दर्शनापें आलें जीवन [पं. भावन वो. ] ॥ ३ ॥

३८५. पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदी पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी होतें [पं. होते बाईले लपाले.] वहिलें लपाला आतां खांदीं। कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ ६५ ॥ मागें बहुतांचा अंतरला संग मुळें जयाचिया तेणें केला त्याग। [पं. पैल.] पहिलें पाहातां तें हरपलें अंग खुंटली वाट नाहींसें जालें जग वो ॥ २ ॥ शोकें वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा । केला उच्चार [पं. उच्चार.] रे घडल्या दोषांचा जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥ ३ ॥

३८६. काय उणें कां करितोसि [त. दे. करिशील.] चोरी किती सांगों तुज नाइकसी हरी । परपरता [पं. परे परता.] तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ माया करुणा हे [पं. करिती.] करिते बहुत । किती सोसूं या जनांचे [पं. जगाचे.] आघात । न पुरे अवसरु हें चि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि स्थिर चित्त वो ॥ ६५ ॥ बहुत कामें मी गुंतलियें घरीं जासी डोळा (पं. हे शब्द नाहींत.] तूं चुकावूनि हरी । करितां लाग न येसी च पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥ २ ॥ तुज ह्मणीयें मी न संगें अनंता । नको जाऊं या डोळियां परता । न लगे जोडी हे तुजविण आतां । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो [पं. हे शब्द नाहींत.]॥ ३ ॥

३८७. घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिली कां पडिली दुश्चित्ती । कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य [पं. सेजेसी नाहीं.] शेजे नाहीं दिसे पती वो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बोले दूतिकेशीं राधा हैं वचन । मशीं लाघव दाखवी नारायण । ह्मणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज पूर्ण वो ॥ ६६ ॥ धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता । तैं पाचारिलें होउनि ये [पं. येई.] वो सीता । लाजिनली [पं. त. लाजीनली.] रूप नये पालटितां । जाला भीमकी आपण राम सीता वो ॥ २ ॥ सत्यभामा दाव करी नारदासी। तैं कळला वो मज त्द्दषीकेशी । तुळे घालितां न ये कनक वो [पं. हे शब्द नाहींत.] रासी। सम तुके एक पान तुळसी वो ॥ ३ ॥ मज भुली पडली कैशापरी । आह्मां भोगूनि [पं. ह्मणवी.] ह्मणे मी [पं. हे शब्द नाहींत.] ब्रह्मचारी दिली वाट यमुने माये खरी । तुह्मां आह्मां न कळे अद्यापवरी वो ॥ ४ ॥ जाणे जीवींचें सकळ नारायण असे व्यापूनि तो न दिसे लपून । राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका ह्मणे येथें भाव चि कारण वो ॥ ५ ॥

३८८. मिळोनि गौळणी देती यशोदे गाऱ्हाणीं । दहिं दुध तुप लोणीं शिंकां नुरे कांहीं । मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ हरि सोंकला वो हरि सोंकला वो । सोंकला तो [पं. बरी.] वारीं तुज लाज नाहीं तरी आम्हां सांपडतां उरी तुज मज नाहीं ॥ ६६ ॥ तुज वाटतसे कोड [पं. कोडे.] यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागलें वो । आह्मी जाऊं तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगों भांडखोरी लाज वाटे आह्मां ॥ २ ॥ मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणे । तंव दसवंती ह्मणे आणा शीक लावूं । थोर आणिला कांटाळा घरीं दारीं लोकपाळां । डेरा रिघोनि गुसळा तेथें लोणी खाय ॥ ३ ॥ मिळोनि सकळा दावें लावूनियां गळां । कैशा बांधिती उखळा येथें राहे उगा । बरा सांपडलासी हरी आजिच्यानें करिशिल चोरी डोळे घालुनियां येरी येरीकडे हांरो ॥ ४ ॥ फांकल्या राकळा उपडूनियां उखळा | मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही । उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धांवे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥ ५ ॥

३८९. गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें । जाला पानसरा मिठी घातली पदरा आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सर [पं. सर जाऊं दे रे सर जाऊं दे परता.] जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता । खेपा खुंटलिया ॥ ४६ ॥ आसुडी पदरा धरी आणीक [पं. आणी.] दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी । आलों गेलों बहु वेळां नेणों गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी [पं. वेडा होसी ] ॥ २ ॥ आह्मी येथें अधिकारी मागें केली तुह्मी चोरी। आतां कळलियावरी मागें केलें [पं. तयाचे. ] त्याचें । बोलिल्या हांसुनी आह्मी सासुरवासिनी । कां रें झोंबसी दुरूनी करी मात कांहीं ॥ ३ ॥ बांयां परनारी कैशा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं । जडला जिव्हारी फांकों नेदी तया नारी । जेथें वर्म तें घरी जाऊं पाहे तियेचें ॥ ४ ॥ तया हातीं सांपडल्या हाटीं पार्टी चुकाविल्या | कृष्णमिळण मिळाल्या त्याही न फिरती । तुका ह्मणे खंती वांयां न धरावी चित्तीं । होतें तुमच्या संचितीं वोडवलें आजि ॥ ५ ॥

३९०. हरी तुझी कांति रे सांवळी मी रे गोरी चांपेकळी तुझ्या दर्शनें होइन काळी । मग हें वाळी जन मज ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडवड कांबळा । अरे नंदबाळा आलगटा ॥ ६५ ॥ तुझिये अंगीं धुरट घाणी । बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥ २ ॥ मज ते हांसतिल [त. दे. हांसइल. ] जन। धिःकारिती मज देखोन । [पं. अंगीथें.] अंगीं तुझें देखोनि लक्षण | मग विटंबणा होइल रे ॥ ३ ॥ तुज [पं. तुज तंव.] लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं। कसी भीड नाहीं तुज माझी ॥ ४ ॥ वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ। जीवन्मुक्त करूनि भोगी ॥ ५ ॥

३९१. सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गाऱ्हाणें देती कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें । दहिं दुध लोणी शिंकां नुरे चि कांहीं कवाड जैशाचें तैसें । चाळवूनि नाशिलीं कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे बाइये ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी । मिळोनि सकळ जणी करूं वाखा सखीं तुज मज होईल तुटी गे बाइये ॥ ६५ ॥ नेणे आपपर लौकिक वेव्हार भलते ठायीं भलतें करी । पाळतुनि घरीं आह्मी नसतां तेथें आपण संचार करी । सोगया चुंबन देतो आलिंगन लोळे सेजाबाजावरी । शिंकीं कडा फोडी गोसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाइये ॥ २ ॥ आतां याची चाड नाहीं आह्मां भीड सांपतां कोड पुरवूं मनिचें । सोसिलें बहु दिस नव्हता केला निस ह्यणुनि एकुलतें तुमचें । चरण खांबीं जीवें बांधेन [ दे. क. त. बांधन] सरिसा जवें न चले कांहीं याचें । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा भलतें हो या जिवाचें गे बाइये || ३ || घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां । निष्ठुर वाद झणीं बोलाल सकळा क्षोभ जाइल माझ्या बाळा । जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये [क. बाइगे.] ॥ ४ ॥

३९२. विरहतापें फुंदे छंद करिते जाती। हा गे तो गे सावधान सवें चि दुश्चिती । न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे कुळाहुनिया ती [पं. ती यो] ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ खुंटलीसी जाली येथें अवघियांची गती । आपुलीं परावीं कोण नेणें भोंवतीं । [पं. त्यांच्या नांवें बो बोमे बोमे आवो श्रीपती] त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपती । नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥ ६ ॥ बाहेरी च धांवे रानां न धरी च घर । न कळे बंधना जाला तेणें संचार | विसरूनि गेली सासुरें कीं माहेर एका अवलोकी एका पडिला विसर ॥ २ ॥ तुका ह्मणे तुह्मी अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं येथें सर्वथा बळा । त्याचा त्याच्या मुखें [पं. क. अवघियांचा.] अवघाची निर्वाळा । बहुतां मतें येथें तर्कवाद निराळा [पं. क. निराळा वो. ] ॥ ३॥

३९३. ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एक ठायीं कवतुकें । कळों नेदी माया [पं. क. त्यास च तें.] त्याचें त्यास ठाउकें । खेळतोंसें दावी लक्षलक्षापें मुकें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा | आवडे तया त्या [पं तया ते संकल्प वाहाती मना क. तया त्या संकल्प वाहाती मना.] वाहाती संकल्प मना । काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना [पं. हा चरण नाहीं.] एकांताचें सुख जाती घेवोनियां राणा ॥ ६५ ॥ [क राना.] अवघियांचा जाणें जाला मेळासा हरी मिळोनियां जावें तेथें तया भीतरी । कळों नेदी घरिच्या करी गोवूनी चोरी | हातोहातीं नेती परपरत्या दुरी ॥ २ ॥ आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा [पं. त्यजिले पाविखे. ] त्यजिलें पारिखें जन । एकाएकीं तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका ह्मणे एका नारायणा वांचून ॥ ३ ॥

३९४. खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्न [पं. क. नग्न वी.] चि या नारी तेथें देखियेल्या । मांडिले विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पायां पडतां रे [पं. हा शब्द नाहीं.] न सोडी नेदी साउलां रे ॥ ६५ ॥ साड्या साउलीं [पं. पातळा. ] पातळें गोंडे कसणिया चोळ्या बुंथी घेउनी सकळा कळंबावरी पळे । [पं. क. खांदी घालुनियां.] खांदी धरूनियां करीं दृष्टि घालोनि सामोरी बैसे पाला वोढी वरी खदखदां हांसे ॥ २ ॥ आनंदें कल्लोळ (पं. कल्लोळा.] बाळा खेळती सकळ [पं. सकळा.] देती उलटिया चपळ [पं. चपळा. ] | एकी एकीहूनि हौस वेल सुर काडी । एकी उगविती [पं. नागविती.] कोडीं । नाना परीच्या निकडी [त. क. विकडी.] खेळ मांडियेला ॥ ३ ॥ एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तंव नारी । ह्मणे नाहीं नेलें चोरी [क. चोरीं.] काय जाणों केव्हां । केला सकळीं हाकारा तंव आलिया बाहेरा । आतां ह्मणतील घरां जावें कैशा परी ॥ ४ ॥ तंव हांसे वनमाळी वरी पाहोनी सकळी । [पं. क. लाजा.] लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात । लाज [क. राखिली. ] राखावी गोपाळा आह्मांजणींची सकळां । काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥ ५ ॥ जोडोनियां कर या गे सकळी समोर वांयां न बोलावें फार बडबड कांहीं । भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन । करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥ ६ ॥ एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे । ह्मणे चला आतां सये जाऊं तयापाशीं । जोडोनियां हात कैशा राहिल्या निवांत । तुका ह्मणे केली मात लाज राखिली तयांची ॥ ७ ॥

३९५. धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया कान्हें। एकली न येतें मी ऐसें काय जाणें । कोठें भरलें अवघड या राणें रे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सोडीं पालव जाऊं दे मज हरी वेळ लागला [पं. लागल्या.] रे कोपतील घरीं । सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगतां नाहीं उरी रे ॥ ६६ ॥ सख्या [त. वे. क. सखिया वेशिया होतिया.] वशिया होत्या मजपाशीं । तुज फावलें रे फांकतां तयांसी । होतें अंतर तर सांपडतें कैसी । एकाएकीं अंगीं जडलासी रे ॥ २ ॥ कैसी भागली हे करितां उत्तर । शक्ति मावळल्या आसुडितां कर । स्वामी तुकयाचा भोगिया चतुर भोग भोगी त्यांचा [पं. राखी] राखे लोकाचार वो ॥ ३ ॥

३९६. गाई गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणिया मिळोनि जगजेटी चेंडू चौगुणा खेळती वाळवंटीं। चला चला हाणती पाहूं दृष्टी वो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ [पं. विव्हळ तें] देखावया हरी । मिस पाणियाचें करितील घरीं । बारा सोळा मिळोनि परस्परीं वो ॥ ४५ ॥ चिरें चोळिया त्या घुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्णमूर्ती । कोणा नाठवे [पं. नाठवे हे. ] कोण कुळ याती । जालीं तटस्छ [वे. त. क. ताटस्त.] सकळ नेत्रपातीं वो ॥ २ ॥ दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्ये वाजती नाइके जनमात । करी श्रवण [त. श्रवण हा.] कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा [पं. पुरवी.] पुरवील मनोरथ वो ॥ ३ ॥

३९७. कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ ४५ ॥ रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती न देखें भोंवतीं मी ते माझी ॥२॥ तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला। बोलीं [पं. क. बोली. ] च अबोला करूनियां ॥ ३॥

३९८. गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी [पं. मी हे माझी.] अंगें हारपलीं ॥ ६ ॥ परते चि ना दृष्टी बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेलें मन ॥ २ ॥ तुकयाच्या स्वामीसवें जाली भेटी । तेव्हां जाली तुटी मागल्यांची [पं.क. मागिलाची.] ॥३ ॥

३९९. पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवूं ॥ ६६ ॥ जीवा [पं. क. जीवीं.] आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥ २ ॥ जालें विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥ ३ ॥

४००. कोणी एकी भुलली नारी विकितां गोरस ह्मणे घ्या हरी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ देखिला डोळां बैसला मनीं । तो [पं. तो थि.] वदनीं उच्चारी ॥ ४५ ॥ आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुकें ॥ २ ॥ तुका ह्मणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥ ३ ॥

Getting Info...
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.