संत तुकाराम गाथा - अभंग क्रमांक २०१ ते ३०० | Sant Tukaram Gatha Abhang 201 to 300

संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक २०१ ते ३००. येथे आम्ही सार्थ तुकाराम गाथा चे अभंग संग्रह करण्याचा प्रयत्न केला आहे.
संत तुकाराम गाथा - अभंग क्रमांक २०१ ते ३०० - शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता

विटूदांडू - अभंग १.

२०१. सारा विटूदांडू । आणीक कांहीं खेळ मांडूं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ ६५ ॥ कोली हाणे टोला झेली तेणें तो गोविला ॥ २ ॥ एकमेकां हाका मारी। सेल जाळी एक धरी ॥ ३ ॥ राजी आलें नांव | फेरा न चुके चि धांव ॥ ४ ॥ पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥ ५ ॥ एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥ ६ ॥ तुका ह्मणे आतां । खेळ मोडावा परता ॥ ७ ॥

२०२. पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ करिती नामाचें चिंतन | गडी कान्होबाचें ध्यान आली ॥ ध्रु.॥ द्यावी डाई । धांवे वळत्या मागें गाई ॥ २ ॥ एके ठायीं काला । तुका ह्मणे भाविकाला ॥ ३

२०३. पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजि वांचों आह्मी जीवें ॥ १ ॥ ॥ध्रु.॥ धांव रे हरी सांपडलों संधी वोणव्याचे मधीं बुद्धि कांहीं करावी ॥ ६५ ॥ अवचितां जाळ येतां देखियेला वरी । परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥ २ ॥ सभोंवता फेर रीग न पुरे पळतां । तुका ह्मणे जाणसी तें करावें अनंता ॥ ३ ॥

२०४. भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बाप रे हा देवांचा ही देव कळों । नेदी माव काय करी करवी ते ॥ ५ ॥ पसरूनि मुख विश्वरूप खाय जाळ | सारूनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥ २ ॥ तुका ह्मणे आह्मी मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शिण ॥ ३ ॥

२०५. नेणती तयांसि साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पांवा वाजवी मोहरी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ चला रे याच्या पायां लागों आतां राखिलें जळतां महा आगीपासूनि ॥ ६५ ॥ कैसी रे कान्होबा एवढी गिळियेली आगी । न देखों पोळला तुज तोंडीं कोठें अंगीं ॥ २ ॥ तुका ह्मणे तुह्मी कां रे करितां नवल | आमची सिदोरी खातो त्याचें आलें बळ ॥ ३ ॥

२०६. त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तो चि देईल तें खावें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हा चि निर्धार त्याला ॥ ६५ ॥ [ दे. पं. कान्होबा तूं जेवीं घासोघासीं.] कान्होबा तूं जेवीं घासोघासीं ह्यणती । आरुष गोपाळें त्यांची बहु देवा प्रीती ॥ २ ॥ तुका ह्मणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोय वांचविलें ऐसें सांगों रे दातारा ॥ ३ ॥

२०७. घ्या रे भोंकरें भाकरी । दहींभाताची सिदोरी। ताक सांडीं दुरी असेल तें तयापें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ येथें द्यावें तैसें घ्यावें। थोडें परी निरें व्हावें । सांगतों हैं [पं. सांगतों रे. ] ठावें । असों द्या रे सकळां ॥ ६५ ॥ माझें आहे तैसें पाहे । नाहीं तरी घरा जाये। चोरोनियां माये । नवनीत आणावें ॥ २ ॥ तुका ह्मणे घरीं । माझें कोणी नाहीं हरी । नका करूं दुरी । मज पायां वेगळें ॥ ३ ॥

२०८. काल्याचिये आसे | देव जळीं जाले मासे । पुसोनियां हांसे टिरीसांगातें हात ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ लाजे त्यासि वांटा नाहीं । जाणे अंतरींचें तें ही दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥ ४५ ॥ उपाय अपाय यापुढें । खोटे निवडितां कुडे जोडुनियां पुढें । हात उभे नुपेक्षी ॥ २ ॥ तें घ्या रे सावकाशें। जया फावेल तो तैसें । तुका ह्मणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥ ३ ॥

२०९. गोपाळ ह्मणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आह्मी जीवीची तया आवडी सांगों । एक ह्मणती उगे रे उगे मागें चि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवधे चि जागों ॥ १ ॥ ॥ध्रु.॥ जाणोनि नेणता हरि रे मध्यें उगाचि बैसे । नाइकोनि बोल अइके कोण कोणाचें कैसे एक एकाच्या संवादा [पं. संवादें.] जाणे न मिळे ची ऐसें । [पं. पोटांतील.] पोटीचें होटा आणवी देतो तयांसि तैसें ॥ ४५ ॥ एक ह्मणति बहु रे आह्मी पीडिलों माया । नेदी दहींभातसिदोरी ताक घालिती पिया तापलों वळितां गोधनें नाहीं जीवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥ २ ॥ एक ह्मणति तुमचें [त. ह्मणती अरे तुमचें.] अरे पोट तें किती । मागों गाई हौसी घोडे रे धन संपत्ति हत्ति देव गडी कान्हो आमुचा आह्मां काय विपति [वें. हार्ति. ] । कन्याकुमरें दासी रे बाजावरी सुपती ॥ ३ ॥ एक ह्मणती बेटे हो कोण करी जतन गाढव तैसें चि घोडें रे कोण तयाचा मान | लागे भवरोग वाहतां खांदीं चवघे जण हातीं काठ्या डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥ ४ ॥ एक ह्मणती रानीं रे बहु सावजें फार फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील कर। राखोनि राखे आपणा ऐसा काइचा शूर । बैसोनि राहों [पं. धीर.] घरीं रे कोण करी हे चार ॥ ५ ॥ घरीं बैसलिया बहुतें बहु सांगती काम | रिकामें कोणासि नावडे ऐसें आह्मासि ठावें । चौघांमध्यें बरें दिसेसें तेथें नेमक व्हावें । लपोनि सहज [पं. खेळतां सहज.] खेळतां भलें गडियासवें ॥ ६ ॥ एक हाणती गडी ते भले मिळती मता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता । नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥ ७ ॥ एक ह्मणती खेळतां उगीं राहतीं पोरें । ऐसें काय घड़ों शके रे कोणी लहान थोरें । अवघीं येती रागा रे एका ह्मणतां बरें । संगें वाढे कलह [पं. संगें वाटे कलह करावा. ] हरावा एकाएकीं च खरें ॥ ८ ॥ एक ह्मणती एकला रे तूं जासील कोठें । सांडी मांडी हैं वाउगें तुझे बोल चि खोटे ठायीं राहा उगे ठायीं च कां रे सिणसी वाटे । अवघियांची सिदोरी तुझे भरली मोटे ॥ ९ ॥ तुका ह्मणे [पं. अरे काहण्या काय.] काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं जागा करूं या रे कान्होबा मागों कवळ ताटीं । धाले गडी तुका ढेकर देतो [पं देती.] विठ्ठल कंठीं ॥ १० ॥

२१०. आजि ओस अमरावती काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥ १ ॥ ॥ध्रु.॥ आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ ६५ ॥ जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगांत गोपाळांसहित | क्रीडा करी कान्होबा ॥ २ ॥ तया सुखाची शिराणी । तीं च पाउलें मेदिनी । तुका ह्मणे मुनि । धुंडितां न लाभती ॥ ३ ॥

२११. चला बाई पांडुरंग पांहू वाळवंटीं। मांडियेला काला भोंवती गोपाळांची दाटी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आनंदें कवळ देती एकामुखीं एक। न ह्मणती सान थोर अवधीं सकळिक ॥ ४५ ॥ हमामा हुंबरी पांवा [त. पांवा वाती ताल्ला लोरी बे. पंढरपुराप्रमाणे होता तो तळेगांवाप्रमाणे मागून केला आहे.] वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनियां हरी ॥ २ ॥ लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥ ३ ॥ पुष्पाचा वरुषाव जाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनियां माळा घालितील कंठीं ॥ ४ ॥ यादवांचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका ह्मणे सुख वाटे देखोनियां मना ॥ ५ ॥

२१२. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यांतुनी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आपआपणामध्यें मिळों । एक खेळों काशीं ॥ ६५ ॥ घाबरियांच्या मोडा काड्या | धाडा भांड्यां [पं. भ्याडां.] वळतियां ॥ २ ॥ तुका ह्मणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥ ३ ॥

२१३. हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ वोरसलें कामधेनूचें दुभतें | संपूर्ण आइतें गगनभरी ॥ ६ ॥ संत सनकादिक गोमट्या परवडी | विभाग आवडी इच्छेचिये ॥ २ ॥ तुका ह्मणे मधीं घालूं नारायण मग नव्हे सीण कोणा खेलें ॥ ३ ॥

२१४. अधिकाचा मज कांटाळा । तुह्मां गोपाळां संगति ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ काय नाहीं तुह्मापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ ६५ ॥ उद्योगाचा नेघें भार । लागल्या सार पुरतें ॥ २ ॥ तुका ह्मणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥ ३ ॥

२१५. जालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सरलों हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ ६५ ॥ सोडोनियां गांठीं पाहें काय आहे त्यांत तें ॥ २ ॥ तुका ह्मणे जालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा ॥ ३ ॥

२१६. या रे करूं गाई | जमा निजलेती काई । बोभाटानें आई घरा गेल्या मारील ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ घाला घाला रे कुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ ६५ ॥ नेणोनियां खेळा | समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा | मिळालेति दुश्चित ॥ २ ॥ तुका ह्मणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥ ३ ॥

२१७. वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीनें वाढावें ॥ ४५ ॥ सांगितलें केलें काम नव्हे धर्म सत्याचा ॥ २ ॥ तुका ह्मणे नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें ॥ ३ ॥

२१८. येइल तें घेइन भागा नव्हे जोगा दुसरिया ॥ १॥ ॥ ध्रु. ॥ आवडी ते तुह्मी जाणा । बहु गुणांसारिखी ॥ ६६ ॥ मज घेती डांगवरी सवें हरि नसलिया ॥ २ ॥ तुका ह्मणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥ ३ ॥

२१९. अंतरली कुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । ह्मणतां जगजेठी। धांवें करुणाउत्तरीं ॥ १ ॥ ॥ध्रु.॥ बाप वळिया शिरोमणी । उताविळ या वचनीं । पडलिया कानीं धांवा न करी आळस ॥ ६५ ॥ बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतें चि दाता । पंगतीस बैसवी ॥ २ ॥ वाहे खांदीं पाववी घरा । त्याच्या करी येरझारा । बोबड्या उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥ ३ ॥

२२०. धन्य तें गोधन कांवळी काष्ठिका मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य जाल्या ॥ ४५ ॥ धन्य ते देवकी जसवंती दोहींचें । वसुदेवनंदाचें भाग्य जालें ॥ २ ॥ धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य जालें ॥ ३ ॥ धन्य ह्मणे तुका जन्मा तीं चि आलीं । हरिरंगी रंगलीं सर्वभावें ॥ ४ ॥

२२१. गौळणी बांधिती धारणासि गळा खेळे त्या गोपाळांमाजी ब्रह्म ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाईपाठीं ॥ ६५ ॥ तुका ह्मणे सर्व कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥२॥

२२२. देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ ६५ ॥ मोठें भावार्थाचें बळ | देव जाला त्याचें बाळ ॥ २ ॥ तुका ह्मणे भक्तासाठीं । देव धांवे पाठोवाठीं ॥ ३ ॥

२२३. हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ देवें दिला खातों भाग । कराल तर करा लाग ॥ ६५ ॥ धालें ऐसें पोट । वरी करूनियां बोट ॥ २ ॥ तुका ह्मणे घरीं । मग कैच्या [दे. कँ जी.] या परी ॥ ३ ॥

२२४. अवघें अवघीकडे दिलें पाहे मजकडे अशा संवगडे सहित थोरी लागली ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ कां मेरे धरिला अबोला । माझा वांटा देई मला । सिदोरीचा केला । झाडा आतां निवडे ना ॥ ४५ ॥ भूक लागली अनंता । कां रे नेणसी जाणतां । भागलों वळितां । गाई सैरा ओढाळा ॥ २ ॥ तुका करुणा भाकी । हरि पाहे गोळा टाकी । घेता जाला सुखी । भीतरी वांटी आणीकां ॥ ३ ॥

२२५. आह्मी गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सिदोरीचा करूं काला । एक वांटितों एकाला ॥ ६५ ॥ खेळों आपआपणांशीं । आमचीं तीं आह्यांपाशीं ॥ २ ॥ मिळालों नेणते । तुका कान्होबा भोंवते ॥ ३ ॥

२२६. “अवघियां दिला गोर | मजकरे पाहीना” ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ फुंदे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥ ६६ ॥ आवडती थोर मोटे मी रे पोरटें दैन्यवाणें ॥ २ ॥ तुका ह्मणे जाणों भाव । जीविंचा देव बुझावी ॥३॥

मृदंग पाट्या -अभंग.

२२७. मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मुरडे दंडा दोहीं तोंडें गडियां सावध करी । भेटतियासंगें तया हाल तुजवरी ॥ ६ ॥ गडियां गडी वांटुनि देईं | ज्याचा सोडी ते चि ठायीं ॥ २ ॥ अगळ्या बळें करील काय । तुज देणें लागे डोय ॥ ३ ॥ नवां घरीं पाउला करीं । सांपडे तो तेथें धरीं ॥ ४ ॥ जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥ ५ ॥ सांपडोनि डाईं बहु | काळ गुंतलासी ॥ ६ ॥ बळिया गडी फळी फोडी न धरितां त्यांसी ॥ ७ ॥ चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय । गुंतलासी काय तुका ह्मणे अझूनी ॥ ८ ॥

२२८. पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग। देईन तो भाग आलियाचा बाहेरी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ जागा रे गोपाळा नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ & ॥ न रिघतां ठाव आह्मा ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपा [पं. चांचपाल ] ॥ २ ॥ तुका ह्मणे हातां चढे जीवाचिये साठीं मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥ ३ ॥

२२९. डाई घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ ६५ ॥ मारिती माया घेती जीव नाहीं कीव अन्यायें ॥ २ ॥ तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥ ३ ॥

२३०. आतां हें चि जेऊं हैं चि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ हरिनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ ६५ ॥ चवीं चवीं घेऊं घास ब्रह्मरस आवडी ॥ २ ॥ तुका ह्मणे गोड लागे। तों तों मागे रसना ॥३॥

२३१. अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ साह्य जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ ४५ ॥ थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥ २ ॥ तुका ह्मणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥३॥

२३२. तुजसवें येतों हरी । आह्मां लाज नाहीं तरी उचलिला गिरी। चांग तई वांचलों ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मोडा आतां खेळ । गाई गेल्या जाला वेळ | फांकल्या ओढाळ । नाहीं तो चि आवरा ॥ ४५ ॥ चांग दैवें यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आह्मी नाहीं भय धाक या अनंता ॥ २ ॥ खातों आगी माती आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल । आह्मां वाटतें हैं चित्तीं ॥ ३ ॥ तुका ह्मणे उरी नाहीं तुजसवें। [ये. शाहाणे या भावें दुरी छंद भोलियां । पं. शाहाणे या दुरी । छंद भोळिया भावें ।] शाहाणिया दुरी छंद भोळियां सवें ॥ ४ ॥

२३३. नको आह्मांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाई ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ कोण धांवें त्यांच्या लागें । मागें मागें येरझारी ॥ ६५ ॥ न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥ २ ॥ तुका ह्मणे तूं राख मनेरी । मग त्या येरी आह्मी जाणों ॥ ३ ॥

२३४. मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ ६५ ॥ बांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥ २ ॥ तुका ह्मणे तूं आह्मां वेगळा । राहें गोपाळा ह्मणउनी ॥ ३ ॥

२३५. काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ ६६ ॥ आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥ २ ॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका ह्मणे मिठी घाली जीवें ॥ ३ ॥

२३६. वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ ६५ ॥ भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥ २ ॥ तुका ह्मणे काय वाग्या हाका हातींचा गमावुनियां थिंका ॥ ३ ॥

२३७. अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता ह्मणती गेला ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आपलिया रडती भावें | जयासवें जयापरी ॥ ६६ ॥ चुकलों आह्मी खेळतां खेळ गेला गोपाळ हातींचा ॥ २ ॥ तुका ह्मणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥ ३ ॥

२३८. भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ ६५ ॥ जवळी होतां न कळे आह्मां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥ २ ॥ तुका ह्मणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥ ३ ॥

२३९. काळिया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ ४५ ॥ रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पैं देखिला ॥ २ ॥ आश्वासीत आला करें। तुका खरें हाणे देव ॥ ३ ॥

२४०. हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गळ्या गळा मेळवूनी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ ४५ ॥ योगियांच्या ध्याना जो नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥ २ ॥ तुका ह्मणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास [दे. त. बोबडियां दास कामारी.] हाका मारी ॥ ३ ॥

२४१. धांव कान्होबा गेल्या गाई। न ह्मणे मी कोण ही काई ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आपुलियांचें वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥ ६५ ॥ मागतां आधीं द्यावा डाव बळिया मी तो नाहीं भाव ॥ २ ॥ तुका ह्मणे ऐशा सवें । अनुसरावें जीवेंभावें ॥ ३ ॥

२४२. धाकुट्याचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसें जाणपणें पडिलें अंतर वाढे तों तों थोर अंतराय ॥ ६५ ॥ दोन्ही उभयतां आपण चि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥ २ ॥ तुका ह्मणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥ ३ ॥

२४३. देवाचे ह्मणोनि देवीं अनादर हैं मोठें आश्चर्य वाटतसे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आतां येरा जना ह्मणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ ४५ ॥ त्यजुनी संसार अभिमान सांटा जुलूम हा मोटा दिसतसे ॥ २ ॥ तुका ह्मणे अळस करूनियां साहे । वळें कैसे पाहें वांयां जाती ॥ ३ ॥

२४४. उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ ६६ ॥ स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥ २ ॥ तुका ह्मणे रत्नसार । परि उपकार [पं. परी आधार चिंधीचा. ] चिंधींचे ॥ ३ ॥

२४५. संताचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ ६५ ॥ तुका ह्मणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥ २ ॥

२४६. चुंबळीचा करी चुंबळीशीं संग अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ ५ ॥ माकडाच्या गळां रत्न कुळांगना । सांडूनियां सुना बिदी धुंडी ॥ २ ॥ तुका ह्मणे ऐसा व्याली ते गाढवी फजिती ते व्हावी आहे पुढें ॥ ३ ॥

२४७. सांपडला संदीं । मग बळिया पडे [वे. फंदीं.] बंदीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ ६५ ॥ दाता मागे दान । जाय याचका शरण ॥ २ ॥ तुका ह्मणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥

२४८. सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ ६५ ॥ अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥ २ ॥ तुका ह्मणे नाड । पाप ठाके हिता आड ॥ ३ ॥

२४९. न देखोन कांहीं । म्या पाहिलें सकळ ही ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ जालों अवधियांपरी । मी हें माझें ठेलें दुरी ॥ ६६ ॥ न घेतां घेतलें । हातें पायें उसंतिलें ॥ २ ॥ खादलें न खातां । रसना रस जाली घेतां ॥ ३ ॥ न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥ ४ ॥ नाइकिलें कांनीं । तुका ह्मणे आलें मनीं ॥ ५ ॥

ब्रह्मचारी फिर्याद गेला - अभंग २

२५०. काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ ४५ ॥ अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥ २ ॥ हरिदासांच्या पडती पायां । ह्मणती तयां केलें नागवावें ॥ ३ ॥ दोहीं ठायीं फजीत [पं. जाले.] जालें । पारणें केलें अवकळा ॥ ४ ॥ तुका ह्मणे नाश केला । विटंबिला वेश जिहीं [त. पं. जिणें. ] ॥ ५ ॥

२५१. कुटुंबाचा केला त्याग | नाहीं राग जंव गेला ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ ६५ ॥ अक्षराची केली आटी जरी पोटीं संतनिंदा ॥ २ ॥ तुका ह्मणे मागें पाय । तया जाय स्छळासि ॥२॥

२५२. तारतिम वरी तोंडा च पुरतें अंतरा हैं येतें अंतरीचें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्या ऐसें ॥ ६६ ॥ भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥ २ ॥ तुका ह्मणे मैंद [त. देव.] देखों नेदी कुडें । आदरें [वे. न. आदर. ] चि पुढें सोंग दावी ॥ ३ ॥

२५३. ब्रह्मनिष्ठ काडी । जरी जीवानांवें मोडी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ ६५ ॥ सांगितलें कानीं । रूप आपुलें वाखाणी ॥ २ ॥ भूतांच्या मत्सरें । ब्रह्मज्ञान नेलें चोरें ॥ ३ ॥ शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥ ४ ॥ निंदा [वे. (नवीन फेर केला आहे.) तुका ह्मणे वाणी निंदा स्तुति लावी स्तवन ॥] स्तुति स्तवनीं । तुका ह्मणे वेंची वाणी ॥ ५ ॥

२५४. इहलोकींचा हा देहे । देव इच्छिताती पाहें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ धन्य आह्मी जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥ ६६ ॥ आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥ २ ॥ तुका ह्मणे पावठणी | करूँ स्वर्गाची निशाणी ॥ ३ ॥

२५५. पंडित वाचक जरी जाला पुरता तरी कृष्णकथा ऐके भावें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ ४२ ॥ जाणोनियां लाभ घेईं हा पदरीं गोड गोडावरी सेवीं बापा ॥ २ ॥ जाणिवेचें मूळ उपडोनी खोड जरी तुज चाड आहे तुझी ॥ ३ ॥ नाना परिमळद्रव्य उपचार । अंगीं उटी सारचंदनाची [त. पार.] ॥ ४ ॥ जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी हरिकथेविण ॥ ५ ॥ ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तें चि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥ ६ ॥ तुका ह्मणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ [पं. खळखळे थि.] [दे. (जुना पाठ) आवघें.] आघवें मूळ तेथें ॥ ७ ॥

२५६. आणिकांच्या कापिती माना । निष्ठुरपणा पार नाहीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ ६५ ॥ सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥ २ ॥ तुका ह्मणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥ ३ ॥

२५७. गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ | मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥ ६५ ॥ कागाचिये विष्ठे जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥ २ ॥ शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास यांच्या नामें नाश पातकांसि ॥ ३ ॥ गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार पिंगळेचा ॥ ४ ॥ वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचें पूर्व शुद्ध काय आहे ॥ ५ ॥ न व्हावी तीं जालीं कर्मों [वे. (न. पा.) निंद्य.] नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुक्त ॥ ६ ॥ तुका ह्मणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥ ७ ॥

२५८. सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ ६५ ॥ वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥ २ ॥ तुका ह्मणें ज्याचें तो चि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥ ३ ॥

२५९. ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ संसार करितां ह्मणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ ४५ ॥ आचार करितां हाणती हा पसारा । [पं. न करी त्या. ] न करितां नरा निंदिताती ॥ २ ॥ संतसंग करितां ह्मणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि ज्ञान नाहीं ॥ ३ ॥ धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा [पं. ह्मणताती.] लाविताती ॥ ४ ॥ बहु बोलों जातां ह्मणति हा वाचाळ । न बोलतां सकळ ह्मणती गर्वी ॥ ५ ॥ भेटिसि न वजातां ह्मणती हा निष्ठूर । येतां जातां घर बुडविलें ॥ ६ ॥ लग्न करूं जातां ह्मणती हा मातला । न करितां जाला नपुंसक ॥ ७ ॥ निपुत्रिका ह्मणती पहा हो चांडाळ । पातकाचें मूळ पोरवडा ॥ ८ ॥ लोक जैसा ओक धरितां धरवे ना । अभक्ता जिरे ना संतसंग ॥ ९ ॥ तुका ह्मणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भक्ति करा ॥ १० ॥

२६०. धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आह्मांसि ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ ६६ ॥ न बाणतां स्थिति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥ २ ॥ तुका ह्मणे अधम त्यासी । भक्ति दूषी हरीची ॥३॥

२६१. चवदा भुवनें जयाचिये पोटीं तो चि आह्मीं कंठीं साठविला ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ काय एक उणें | आमुचिये घरीं । वोळगती द्वारीं रिद्धिसिद्धी ॥ ६ ॥ असुर जयानें घातले तोरडीं [दे. पं. तोडरीं.] । तो आह्मांसि जोड़ी कर दोन्ही ॥ २ ॥ रूप नाहीं रेखा जयासि आकार । आह्मीं तो साकार भक्तीं केला ॥ ३ ॥ अनंत ब्रह्मांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आह्यासाठीं ॥ ४ ॥ [ कडवें पं. प्रतींत नाहीं.] रिद्धिसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥ ५ ॥ तुका ह्मणे आह्मी देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥ ६ ॥

२६२. केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय ह्मणती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तैसे पूजिती आह्मां संत । पूजा घेतो भगवंत । आह्मी किंकर संतांचे दास । संतपदवी नको आह्मांस ॥ ६६ ॥ केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥ २ ॥ केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥ ३ ॥ ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका ह्मणे केली कांजी । ज्याची पूजा त्याणें चि घेणें । आह्मीं पाषाणरूप राहणें ॥ ४ ॥

२६३. ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ येरा मानी विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें ह्मणोनियां ॥ ६५ ॥ सर्वभावें जालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥ २ ॥ तुका ह्मणे जैसे मानती हरिदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥ ३ ॥

२६४. दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥ १ ॥ [ धर्म नीतीचा तो ऐकुनी वेव्हार | निवडीलें सार असार तें । हे येथें पंढरीच्या छापील प्रतींत आढळते.] पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥ २ ॥ तुका ह्मणे धर्म रक्षावया साठीं देवास ही आटी जन्म घेणें ॥ ३ ॥

२६५. करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हें तें जननी ॥ ६५ ॥ वियोग तें तिस । त्याच्या उपचारें तें विष ॥ २ ॥ [हरणी चुकली पाढसा धुंडाळी ती दाही दिशा | रानीं हिंडों गेली गाय | घरीं वत्स वाट पाहे ॥ ह्रीं दोन कडवीं पंढरपुरच्या छापील प्रतींत आढळतात.] तुका ह्मणे [पं. मायें.] पायें डोळा सुखावे ज्या न्यायें ॥ ३॥

२६६. कन्या सासुऱ्यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ ६५ ॥ चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥ २ ॥ जीवना वेगळी मासोळी । तैसा [दे. तुका ह्मणे तळमळी.] तुका तळमळी ॥ ३ ॥

२६७. हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ ६५ ॥ सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर ॥ २ ॥ टिळे लपविती पातडीं लेती विजारा कातडीं ॥ ३ ॥ बैसोनियां तक्तां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥ ४ ॥ मुदबख लिहिणें । तेलतुपावरी [वे. "तेल तूप साबण केणें ।" हा पाठ मागून घातला आहे. ] जिणें ॥ ५ ॥ नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥ ६ ॥ राजा प्रजा पीडी। क्षेत्री दुश्चितासी तोडी ॥ ७ ॥ वैश्यशूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ॥ ८ ॥ अवघे बाह्य रंग। आंत हिरवें [पं. बाह्य.] वरी सोंग ॥ ९ ॥ तुका ह्मणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥ १० ॥

२६८. साळंकृत कन्यादान । करितां पृथ्वीसमान [वे. (नवीन शोध.) पृथ्वी दानाच्या समान ] ॥ १ ॥ ॥ध्रु.॥ परि तें न कळे या मूढा । येइल कळों भोग पुढां ॥ ६५ ॥ आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥ २ ॥ सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥ ३ ॥ अन्न मान धन। हें तों प्रारब्धा आधीन ॥ ४ ॥ तुका ह्मणे सोस। दुःख [दे. (नवीन शोध.) सुख.] आतां पुढें नास ॥ ५ ॥

२६९. दिवट्या वाचें लावुनि खाणें करूनि मंडण दिली हातीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ नवरा नेई [पं. नेईल.] नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ ४५ ॥ गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥ २ ॥ करूं द्यावें न्हावें बरें । ठायीचें कां रे न कळे चि ॥ ३ ॥ वऱ्हााडियांचे लागे पाठीं । जैसी उटिका तेलीं ॥ ४ ॥ तुका ह्मणे जोडिला थुंका। पुढें नरका सामग्री ॥ ५ ॥

२७०. ब्रह्महत्या मारिल्या गाई । आणीक काई पाप केलें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ ६५ ॥ नरमांस खादली भाडी हाका मारी हाणोनि ॥ २ ॥ अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिळाषिलें ॥ ३ ॥ उच्चारितां मज तें पाप जिव्हे कांप सुटतसे ॥ ४ ॥ तुका ह्मणे कोरान्न रांड | बेटा भांड मागे ना कां ॥ ५ ॥

२७१. याचा कोणी करी पक्ष तो ही त्याशी समतुल्य ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ ४५ ॥ ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥ २ ॥ तुका ह्मणे त्याचें अन्न मद्यपाना समान ॥ ३ ॥

२७२. कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ ४५ ॥ दाऊं नेणें जडीबुटी चमत्कार उठाउटी ॥ २ ॥ नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥ ३ ॥ नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥ ४ ॥ नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥ ५ ॥ नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥ ६ ॥ नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥ ७ ॥ नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥ ८ ॥ नाहीं जाळीत भणदीं। उदो ह्मणोनि आनंदी ॥ ९ ॥ नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥ १० ॥ आगमीचें कुर्डे नेणें । स्तंभन [पं. स्तंभ आणि उच्चाटणे.] मोहन उच्चाटणें ॥ ११ ॥ नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥ १२ ॥

२७३. रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ ६६ ॥ लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥ २ ॥ तुका ह्मणे धीरा । विण कैसा होतो हिरा ॥ ३ ॥

२७४. पूज्या एकासनीं आसनीं आसन [पं. आसनें.] । बैसतां गमन मातेशीं तें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ सांगतों ते धर्म नीतीचे संकेत | सावधान हित व्हावें तरी ॥ ६५ ॥ संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥ २ ॥ तुका ह्मणे एकाएकीं वरासन [दे. पं. वरासनें] । दुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥ ३ ॥

२७५. जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ ६६ ॥ गुदद्वारा वाटे। मिष्टान्नांचा नरक लोटे ॥ २ ॥ विंचु लाभाविण । तुका ह्मणे वाहे शीण ॥ ३ ॥

२७६. अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ विटे न लगतां क्षण मोल जाय वांयां विण ॥ ६५ ॥ सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥ २ ॥ तुका ह्मणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥ ३ ॥

२७७. आणिकांची स्तुति आह्मां ब्रह्महत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ आह्मां विष्णुदासां एकविध भाव । न ह्मणों या देव आणिकांसि ॥ ४५ ॥ शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥ २ ॥ तुका ह्मणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥ ३ ॥

२७८. तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ माझे मनोरथ सिद्धी | पाववावे कृपानिधी ॥ ६६ ॥ तूं तों उदाराचा राणा । माझी अल्प चि वासना ॥ २ ॥ कृपादृष्टीं पाहें। तुका ह्मणे होईं साहे ॥ ३॥

२७९. संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ येती [पं. येती दगड ते वरी.] दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ ६५ ॥ अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥ २ ॥ तुका ह्मणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥ ३ ॥

२८०. करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अवघें घडे येणें सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ ६५ ॥ हें चि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥ २ ॥ तुका ह्मणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥ ३ ॥

२८१. मागें नेणपणें [पं. नेमतेपणे.] घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननरित ॥ ६६ ॥ उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आह्मां पुढती पाहूं नये ॥ २ ॥ तुका ह्मणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥ ३ ॥

२८२. आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ [पं. नेमतेपणें. ] ॥ कान पसरोनी ऐके वदे दुष्ट वाणी ॥ २ ॥ तुका ह्मणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा ॥ ३ ॥

हनुमंतस्तुति - अभंग ४.

२८३. शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ ४६ ॥ शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥ २ ॥ तुका ह्मणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥ ३॥

२८४. केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसा प्रतापी गहन । सुरां सकळ [पं. सुरां सकळ मोहन.] भक्तांचें भूषण ॥ ६५ ॥ जाऊनि पाताळा । केली देवाची अवकळा ॥ २ ॥ राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥ ३ ॥ जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥ ४ ॥ तुका ह्मणे जपें। वायुसुता जाती पापें ॥ ५ ॥

२८५. काम घातला बांदोडी । [वे. (नवीन पाठ.) काळ घातला तोरडी ।.] काळ केला देशधडी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ ६६ ॥ शरीर वज्रा ऐसें कवळी ब्रह्मांड जो पुच्छें ॥ २ ॥ रामाच्या सेवका । शरण आलों ह्मणे तुका ॥ ३ ॥

२८६. हनुमंत महाबळी | रावणाची दाढी जाळी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ ६५ ॥ करोनी उड्डाण । केलें लंकेचें शोधन [वे. त. दहन. ] ॥ २ ॥ जाळीयेली लंका | धन्य धन्य ह्मणे तुका ॥ ३ ॥

२८७. कुंभ अवघा एक आवा । पाकीं एक गुफे डावा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ ६५ ॥ हिरे दगड एक खाणी । कैचें विजातीसी पाणी ॥ २ ॥ तुका ह्मणे शिरीं । एक एकाची पायरी ॥ ३ ॥

२८८. मांडे पुऱ्या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ ६५ ॥ घोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण काय तें वचन जाळावें तें ॥ २ ॥ तुका ह्मणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥ ३ ॥

२८९. न लगे चंदना सांगावा [पं. पुसावा. ] परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ ६६ ॥ सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर ह्यून ॥ २ ॥ तुका ह्मणे मेघ नाचवी मयूरें। लपवितां खरें येत नाहीं ॥ ३ ॥

२९०. चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवधी गोड ॥ ६५ ॥ तुका ह्मणें तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥ २ ॥

२९१. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ ६६ ॥ मन गुरु आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास गति अथवा अधोगति ॥ २ ॥ साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात। नाहीं नाहीं [पं. आन.] आनुदैवत । तुका ह्मणे दुसरें ॥ ३ ॥

२९२. मायबापें जरी सर्पण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥ १ ॥ चंदनाचा शूळ सोनियाची वेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥ २ ॥ तुका ह्मणे नरकीं घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा ॥ ३ ॥

२९३. शिकल्या बोलाचे सांगतील वाद अनुभव भेद नाहीं कोणा ॥ १ ॥ पंडित हे ज्ञानी करितील कथा | न मिळती अर्था निजसुखा ॥२॥ तुका ह्मणे जैसी लांचासाठीं ग्वाही देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥ ३ ॥

२९४. प्रारब्ध क्रियमाण । भक्तां संचित नाहीं जाण ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ ६५ ॥ सत्वरजतमबाधा । नव्हे हरिभक्तांसि कदा ॥ २ ॥ खाय बोले करी । अवघा त्यांच्या अंगें हरी ॥ ३ ॥ देवभक्तपण । तुका ह्मणे नाहीं भिन्न ॥ ४ ॥

२९५. शास्त्रांचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ ह्मणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ ४५ ॥ सगुण निर्गुण जयाचीं [दे. जयाचीं अंगें.] ह्रीं अंगें। तो चि आह्मां संगें क्रीडा करी ॥२॥ तुका ह्मणे आह्मी विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हों ॥ ३ ॥

२९६. ऐका महिमा आवडीचीं। बोरें खाय भिलटीचीं [पं. मिल्लणीचीं ] ॥ १ ॥ ॥ध्रु. ॥ थोर प्रेमाचा भुकेला | हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ ४५ ॥ पव्हे सुदामदेवाचे फके मारी कोरडे च ॥ २ ॥ न ह्मणे उच्छिष्ट अथवा थोडे तुका ह्मणे भक्तीपुढें ॥ ३ ॥

२९७. कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिति त्वां थोर मानियेली ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ ४५ ॥ तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥ २ ॥ कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ क्षीण होतें ॥ ३ ॥ तुका ह्मणे यासि सांगा कोणी तरी विसरला हरी मायबाप ॥ ४ ॥

२९८. साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहवे ॥ १ ॥ साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥ २ ॥ असाध्य तें साध्य करितां सायास कारण अभ्यास तुका ह्मणे ॥ ३ ॥

२९९. [पं. आमची.] आमचे गोसावी अयाचितवृत्ति । करवी शिष्याहातीं उपदेश ॥ १ ॥ दगडाची नाव आधीं च ते जड ते काय दगड तारूं जाणे ॥ २ ॥ तुका ह्मणे वेष विटंबिला त्यांनीं सोंगसंपादणी करिती परी

३००. मृगजळा काय करावा उतार । पावावया [पं. तीर.] पार पैल थडी ॥ १ ॥ ॥ ध्रु. ॥ खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें [पं. व्यापारें.] लाभ हाणि ॥ ६६ ॥ मंगळदायक करिंती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥ २ ॥ स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं। जागृतीं तो नाहीं साच भाव ॥ ३ ॥ सारीं जालीं मेलीं लटिकें वचन बद्ध मुक्त शीण तुका ह्मणे ॥ ४ ॥

Getting Info...
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.